विशेष प्रतिनिधी
पुणे : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं, अशी भूमिका व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शस्त्रसंधीच्या निर्णयाला समर्थन आहे..
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मागील तीन-चार दिवसांपासून विकोपाला गेला होता.अखेर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यासाठी तयार दर्शवली आहे. दोन्ही देशात युद्धविराम झाल्याची घोषणा ‘मध्यस्थ’ या नात्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. शरद पवार यांनी यावर ट्विट करत म्हटले आहे की , भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही.
ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे.
भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं. जय हिंद!
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते शरद पवार यांनी ही भूमिका मंडळी असली तरी काँग्रेसला मात्र काय भूमिका घ्यावी हे समजेनासे झाल्याचे चित्र आहे. १९७१ साली पाकिस्तानबरोबर झालेलं युद्ध आणि बांगला देशाची निर्मिती याचा संदर्भ देऊन काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीका केली आहे.
A step towards peace, the strength of collective fight against terrorism, Sharad Pawar supports the ceasefire decision
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित