विशेष प्रतिनिधी
पुणे : हिंजवडी , चाकण आणि पूर्व पुण्याची मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागाची एक महापालिका अशा तीन नव्या महापालिका पुणे जिल्ह्यात करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. वाहतूक कोंडी तसेच नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. कोणाला आवडेल किंवा नाही, तरीही मी करणारच असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
हिंजवडी , चाकण हे आयटी आणि ऑटो हब वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. येथील अनधिकृत बांधकामे, वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी तेथील ग्राम पंचायती एवढ्या सक्षम नाहीत. यामुळे पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
चाकण आणि परिसरात एक महापालिका, हिंजवडी भागात एक महापालिका आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागाची एक महापालिका होणार आहे.
चाकण भागातील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पहाटे ५.४५ वाजताच अजित पवार चाकणला पोहोचले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, तळेगाव ते शिक्रापूर मार्ग सहा पदरी करणार आहे. पुणे-नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करू, तुमची त्रासातून मुक्तता करु. चाकण एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यांची कोंडी फोडावी लागणार आहे.
Ajit Pawar announces three new municipal corporations for Hinjewadi, Chakan and East Pune
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल