Ajit Pawar : अजित पवार यांचे पक्षावर नियंत्रण राहिले नाही, सुरज चव्हाण नियुक्तीवरून रोहित पवार यांची टीका

Ajit Pawar : अजित पवार यांचे पक्षावर नियंत्रण राहिले नाही, सुरज चव्हाण नियुक्तीवरून रोहित पवार यांची टीका

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ajit Pawar  अजितदादांनी भूमिका बदलली आहे का? तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल नाही का?, तटकरे म्हणतात सर्व नेत्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला आणि अजित पवार म्हणतात माहिती नाही. मग तटकरे यांच्या नेत्यांमध्ये अजित पवार येत नाही का? असा सवाल करतअजित पवार यांचे पक्षावर नियंत्रण राहिले नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.Ajit Pawar

पत्रकारांशी बोलताना मारहाण प्रकरणात युवक प्रदेश अध्यक्षपद काढून घेतलेल्या सूरज चव्हाण यांना प्रदेश सरचिटणीस करण्याच्या मुद्द्यावर हल्लाबोल करताना रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांचा पक्षात सर्व जण एका विचाराचे आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण पक्ष त्यांच्या हातात राहिला आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. सूरज चव्हाण यांनी एका शेतकरी नेत्याला मारहाण केली म्हणून त्यांचे पद काढण्यात आले होते तसे ट्विट अजित पवारांनी केले होते. पण सुरज चव्हाण यांना पक्षात प्रमोशन देण्यात आले आहे. सूरज चव्हाण यांना बढती देण्यात सूरज चव्हाण यांचा रोल होता का? अजित पवारांनी केलेले ट्विट खोटं होत का?

भाजपची रणनीतीच फोडा आणि राजकारण करा अशी असल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले, मराठी-अमराठी, हिंदू-मुस्लीम, ओबीसी- मराठा अशा वादांमध्ये जनतेला अडकवण्याचा डाव आहे. भाजप आता आरएसएस पेक्षा मोठा झाला आहे का? सत्तेच्या हव्यासापोटी भाजपकडून नैतिकता आणि संघाच्या विचारांनाही तिलांजली देण्यात आली आहे. महायुतीतील अनेक नेते केवळ पद आणि पैशाच्या मागे धावणारे आहेत.आम्ही सर्व जण संविधानावर विश्वास ठेवणारे लोकं आहोत. भाजप नेहमी एक ट्रॅप मध्ये लोक अडकावेत ही भाजपची भूमिका आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी हिंदू-मुस्लीम करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला.आता मुंबईची निवडणूक असल्याने मराठी-अमराठी आणि कबुतर प्रेमी आणि कबुतर न प्रेमी यासह शाकाहारी अन् मांसाहारी या सर्व गोष्टीमध्ये लोकांनी अडकवून ठेवत आहे.

शेतकरी, युवक आत्महत्या, बेरोजगारी, माता भगिनींवर होणारे अत्याचार यावर कुणीही बोलायला तयार नाही. भाजपचे लोक ही यावर बोलायला तयार नाही. म्हणून इतर वाद निर्माण केला जात आहे. ही भाजपची चाल असून त्यात कुणी अडकू नये. अजित पवारांनी एक भाष्य केले आहे. पण केवळ भाष्य करुण होत नाही. अजित पवारांचे मित्रपक्ष जे विष पेरत आहे त्याविरोधात त्यांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी अजित पवार यांचा पक्ष चालत आहे का? त्यांच्या समाधिस्थळी नतमस्तक आपण होत आहोत पण विचारांचे काय? हे सांगण्याची वेळ आता आली आहे. अजित पवार हे खमके नेतृत्व आहे, ते विचार सोडून भाजपसोबत गेल्याने आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही. प्रशासनाच्या माध्यमातून जे मुद्दे समोर येत आहे, त्यावर त्यांनी आपली पकड घट्ट आहे हे दाखवून दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, ज्या नेत्याने हा पक्ष उभा केला शरद पवार यांची साथ सोडली आमदारांना निवडून आणले त्या अजित पवारांना पक्षात वेगळे केले जात असेल तर लक्षात घ्या भाजपचा व्हायरस आमच्या पक्षाला लागला, वेगळा पक्ष तयार केला. आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपचा व्हायरस तोडत असल्याचे सिद्ध होत आहे. भरत गोगावले यांचे अडीच वर्षे मंत्रिपदाची वाट बघण्यात गेले. त्यांचे खाते छोटसं आहे. त्यांना अजून 4 वर्षे पालकमंत्रिपदासाठी वाट बघावी लागणार आहे. भाजपने आपला पक्ष फोडला आपल्याला वाऱ्यावर सोडले आता आपण आमदार होतो का नाही हा प्रश्न त्यांना निर्माण होऊ शकतो. हे सर्व नेते पदाच्या मागे पळणारे नेते आहेत. त्यांना मंत्रीपद पाहिजे, ते मिळाले तर पालक मंत्रीपद पाहिजे तेही मोठ्या जिल्ह्याचे तिथे पैसा मोठा पाहिजे. महायुतीमधील नेत्यांचे एकच काम आहे ते म्हणजे सरकारचा पैसा खाणं.

रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लांबलेले होते. अमेरिका आपल्याला कसे वागवत आहे यावर त्यांनी बोलायला हवे होते. पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनसोबत ते चर्चा करत आहे. पाकिस्तानसोबत लढताना जगातील कोणत्याच देशाने आपल्याला साथ का दिली नाही यावर त्यांनी बोलायला हवे होते. युवक, महिलांबद्दल त्यांची यंत्रणा काही करु शकत नाहीये. पुढच्या महिन्यात आपल्याला समजेल की आरएसएस महत्त्वाचे आहे की भाजपचे नेते महत्त्वाचे आहेत. भाजपचे नेते आरएसएस च्या वयाच्या मुद्द्याचे पालन करतात का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आज भाजपची रा.स्व.संघापेक्षा जास्त ताकद असल्याचे दिसून येत आहे.

Ajit Pawar no longer has control over the party, Rohit Pawar criticizes Suraj Chavan’s appointment

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023