विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणात घेतलेल्या भूमिकेवरून अडचणीत आल्या आहेत. त्याच्याच पक्षाचे सर्वेसर्वा असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यावर संतापले आहेत. चाकणकर यांना जाब विचारणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे. Ajit Pawar
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले असून, या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी तर चाकणकर पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असल्याचा थेट आरोप केला आहे. पीडितेच्या वडिलांनीही चाकणकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. आता अजित पवार यांनी देखील रूपाली चाकणकरांनी घेतलेल्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. या वेळी कुटुंबीयांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांनी महिला आयोगाच्या भूमिकेविषयी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर, अजित पवारांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
मी नेहमी सत्याच्या बाजुने असतो. रूपाली चाकणकर यांच्या मताशी आम्ही सहमत नाही. या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा करणार आहोत. त्यांच्या मताचे कोणीही आम्ही समर्थन करणार नाही. तसेच त्यांनी असे का केले याचे कारण विचारणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. याशिवाय, या प्रश्नावर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करण्याचे आश्वासन अजित पवारांनी कुटुंबीयांना दिले आहे.
दरम्यान, अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल रूपाली चाकणकरांचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद संकटात सापडल्याची चर्चा सुरू आहे. आता अजित पवार नेमका काय निर्णय घेतात, रूपाली चाकणकरांना जाब विचारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, रूपाली चाकणकर यांना यापूर्वीही वैष्णवी हगवणे आणि तनिषा भिसे प्रकरणांत त्यांच्या भूमिकेमुळे टीकेचा सामना करावा लागला होता. आता फलटण प्रकरणामुळे त्या पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.
दरम्यान, फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये तिने पोलिस अधिकारी पीएसआय गोपाळ बदने याच्याकडून चार वेळा बलात्कार झाल्याचा आणि प्रशांत बनकर यांच्याकडून मानसिक छळ झाल्याचा उल्लेख केला होता. तिच्या पत्रामध्ये राजकारण्यांकडून दबाव असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे. तरीही, चाकणकर यांनी ज्या प्रकारे या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Ajit Pawar will question Rupali Chakankar
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
 
				 
													



















