विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर हे देवेंद्र फडणवीस यांचे एक बेबी आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरला देवेंद्र फडणवीस हे आपली मुलेच मानत असल्याचे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुण्यात एका नियोजित कार्यक्रमासाठी आल्या असता त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस पुण्याकडे एवढे लक्ष का देत असल्याचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे देवेंद्र फडणवीसांचे एक बेबी आहे. मुंबई, पुणे, नागपूर ही आपलीच मुले आहेत असे देवेंद्रजी मानत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर पुण्यात देखील खूप समस्या आहेत. इतके वेगाने शहरीकरण झाल्यामुळे काही गोष्टींकडे अद्याप लक्ष गेलेले नाही.
मलाही अनेकदा असे लक्षात येते की, येथील रस्ते अजून चांगले पाहिजेत, वाहतूक व्यवस्थित पाहिजे. मेट्रो सुरु झाल्यापासून खूप फरक पडलाआहे. मात्र, जो पर्यंत सामान्य माणूस सुखदायी आयुष्य जगत नाही, तोपर्यंत देवेंद्रजी पुण्यातल्या त्यांच्या फेऱ्या कमी करणार नसल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.
माझी आजी देखील पुण्यात राहते. मी जेव्हा जेव्हा इथे येते त्यावेळी मला माहेरी आल्यासारखे वाटते. पुण्यातील लोकांबद्दल मला खूप आपुलकी आहे. पुण्यात येते तेव्हा येथे काय कमी आहे? काय सुधारता येईल? हे मी देवेंद्र फडणवीस यांना देखील सांगत असते,. देवेंद्र फडणवीस यांना देखील कळतेच मात्र, मी देखील त्यांना सांगत असते. त्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष आहे, याचा आपल्याला देखील आनंद असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.
Amruta Fadnavis said, Pune city is a baby of Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार