विशेष प्रतिनिधि
पुणे : पुण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून आता अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नऱ्हे आणि देहू रोड दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडोर बांधण्यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. Elevated Corridor
सिंहगड रोड, नर्हे आणि आंबेगावहून, हिंजवडी आयटी हब किंवा मुंबईकडे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. या नवीन कॉरिडॉरमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल तसेच या रस्त्यांवरील वाहतूक देखील अधिक सुरक्षित होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळजवळ चार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पात एकूण ३२ किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. ज्याचा खर्च हा अंदाजे ५,५०० ते ६,००० कोटी रुपये इतका येणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मते, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिलेली आहे. आता हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल. या योजनेत एकूण दोन टप्पे समाविष्ट आहेत. यातील पहिला टप्पा हा देहू रोड ते पाषाण सुस जोडेल, तर दुसऱ्या टप्प्याचा विस्तार हा पाषाण सुस ते नर्हेपर्यंत असेल. Elevated Corridor
पुणे-बेंगळुरू महामार्गावर, विशेषतः नवले पूल, वारजे, चांदणी चौक आणि रावेत दरम्यान वाहतूक सुरळीत होण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणाराही एक असा मार्ग बांधावा तसेच हडपसर-यवत मार्गावरही अशाच प्रकारचा एक मार्ग जलदगतीने बांधावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
एकदा हा मार्ग सुरू झाल्यानंतर, यामुळे केवळ वाहतुकच सुरळीत होणार नाही तर प्रवशांचा वेळही वाचेल. तसेच लांबलचक वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणार ताण देखील वाचणार आहे. पुण्यातील वाढती लोकसंख्या, विशेषतः वाढत्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी, हे एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे एक महत्वाचं पाऊल असल्याचं बोललं जात आहे. Elevated Corridor
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi मतचोरीच्या ‘अणुबॉम्ब ‘नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकू , राहुल गांधी यांचा इशारा
- Chhagan Bhujbal जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळ आक्रमक, ओबीसीतून मराठा आरक्षण विरोधासाठी मुंबईवर धडक
- ओबीसी कोट्यातून आरक्षणास ‘एसईबीसी’चा अडथळा, मराठा समाजाची दोन्ही आरक्षणे जाण्याची भीती
- Politicians during Ganesh Festival : गणपती बाप्पाच्या दर्शनात राजकारण्यांची मांदियाळी!