Ayush Komkar Case : आयुषच्या खुनासाठी मामा कृष्णानेच दिले पिस्तूल, मारेकऱ्यांची कबुली

Ayush Komkar Case : आयुषच्या खुनासाठी मामा कृष्णानेच दिले पिस्तूल, मारेकऱ्यांची कबुली

Krishna Andekar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ayush Komkar Case गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना चौकात 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुष कोमकरच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिलं जात आहे. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यात आता मोठी अपडेट समोर आली आहे. मारेकऱ्यांनी कबूल केलं आहे की, आयुषच्या खुनासाठी मामा कृष्णानेच पिस्तूल दिलं होतं. तसेच या प्रकरणी आणखी काही खुलासे समोर आले आहेत. Ayush Komkar Case



पोलिसांनी कृष्णा आंदेकरकडे त्याचा मोबाइल मागितला असता, त्याने तो फोडून फेकून दिला असल्याचे सांगितले; तसेच ‘मकोका’ कायद्यानुसार कारवाईची नोटीसही घ्यायला नकार दिल्याची कबुली आरोपीने न्यायालयात दिली. आयुष कोमकरवर गोळीबार करून त्याचा खून करण्यासाठी मारेकऱ्यांनी वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरनेच दिले होते. हे पिस्तूल त्याला कोणी पुरविले; तसेच गुन्हा केल्यानंतर फरारी असताना तो कुठे व कोणाच्या संपर्कात होता, या कालावधीत त्याने गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला आहे का? याबाबत तपास करायचा असल्याची माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणाऱ्या आरोपींमधील प्रमुख ‘लिंक’ असल्याचा दावाही तपास अधिकाऱ्यांनी केला. Ayush Komkar Case

माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष बो गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून निघृण खून केल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) याच्यासह १३ जणांवर खून व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (३६, रा. नाना पेठ) स्वतःच्या भाच्याच्या खुनानंतर पसार झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्याचा माग काढत होती.

‘कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाही तर त्याचा एन्काउंटर करू,’ अशी धमकी दिल्याचा खळबळजनक दावा बंडू आंदेकर याने सोमवारी केला होता. दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात शरण आला. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक करून विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले. ‘मालमत्ता व पैशांच्या वादातून हा खून झाला असून, त्यात कृष्णा आंदेकरची मुख्य भूमिका आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णाने दिले असल्याची कबुली अमन पठाण व सुजल मेरगू यांनी दिली आहे. कृष्णाने पिस्तूल कोठून आणले, फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता आदी मुद्द्यांवर तपास करायचा आहे. आरोपीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती मिळवायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी,’ अशी मागणी सहायक आयुक्त शंकर खटके व विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. आरोपीच्या वतीने अॅड. मनोज माने, अॅड. मिथुन चव्हाण, अॅड. प्रशांत पवार यांनी बाजू मांडली. ‘गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आधीच जप्त करण्यात आले आहे. आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असून, तपास यंत्रणेला सहकार्य करत आहे. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही,’ असा युक्तिवाद अॅड. मनोज माने यांनी केला.
सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपी कृष्णा आंदेकरला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे या गुन्ह्यातील सर्व आरोपी आता पोलिस कोठडीत असून, तपास अधिकाऱ्यांना त्यांची वैयक्तिक व एकत्रित चौकशी करता येणार आहे.

Ayush Komkar Case : Uncle Krishna gave the pistol for Ayush’s murder, killers confess

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023