विशेष प्रतिनिधी
पुणे : सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अॅड. असीम सरोदे यांच्या वकिली सनद रद्द करण्याची कारवाई महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने केली आहे. न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबाबत सार्वजनिक चर्चेदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. Asim Sarode
तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सरोदे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अवमान झाला असून, नागरिकांमध्ये न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे. तक्रारदाराने या वक्तव्यांना अशोभनीय, गैरजबाबदार आणि बदनामीकारक ठरवून 12 ऑगस्ट 2025 रोजी बार कौन्सिलकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी बार कौन्सिलने अॅड. विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. Asim Sarode
समितीमध्ये अॅड. संग्राम देसाई आणि अॅड. नेल्सन राजन हे सदस्य होते. चौकशीनंतर समितीने अॅड. सरोदे यांच्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन झाल्याचे निरीक्षण नोंदवून त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाईची शिफारस केली होती. या शिफारसीनुसार बार कौन्सिलने अखेर सरोदे यांची वकिली सनद रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर अॅड. सरोदे यांना न्यायालयीन व्यवसाय करण्यास मनाई राहणार आहे.
असीम सरोदे हे महायुती सरकारचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीच्या काळात असीम सरोदे, निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांनी निर्भय बनो अभियान सुरू केले होते. यावेळी त्यांच्या गाडीवर हल्लाही झाला होता.
Bar Council Cancels Advocate Asim Sarode’s Licence to Practice Over Controversial Remarks
महत्वाच्या बातम्या
- पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली
- चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन
- पुणे पोलीस आयुक्तालयात तोतया आयपीएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
- शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा



















