भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार ? भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल

भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार ? भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल

Bharat Gogawle

विशेष प्रतिनिधी

अलिबाग: जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार ? आव्हान स्वीकारून चालतो तोच यशस्वी होतो. मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात असा हल्लाबोल मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केली आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा तापला असून रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू होती. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली.

मात्र पूर्वी ज्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून झाली आहे, तेच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील असं ठरलं होतं. त्यामुळे आज आदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं. यावर बोलताना आता भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनीत तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.


लबाडपणा केजरीवाल यांच्याकडून शिका, भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवत अमित शहा यांचा हल्लाबोल


मंत्री म्हणून त्यांनी झेंडावंदन केलं, आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. जर मी काही चुकीचं काम केलं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी देखील आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री या आदिती तटकरे होत्या, त्यांना वैतागून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी उठाव केला, आणि त्यानंतर गुवाहाटीचं लोण संपूर्ण राज्यात पसरलं. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं. पण इतकं होऊन सुद्धा सुनील तटकरे यांची महायुतीच्या सरकारमध्ये मागच्या दाराने एन्ट्री झालीच, आणि पुन्हा एकदा त्यांची जादू चालली. त्यांनी मुलीला मंत्री बनवलं पण पालकमंत्री हे उदय सामंत होते.

आता पुन्हा दुसऱ्यांदा महायुतीची सत्ता आली यावेळेस सुनील तटकरे यांनी जादू केली आणि आपल्या मुलीला पालकमंत्रिपद दिलं. त्यांच्याकडे काय जादू आहे ते माहित नाही. आम्ही पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांचं नाव फायनल केलं होतं, पण ते रात्रीतून कसं बदललं असा प्रश्न दळवी यांनी उपस्थित केला आहे.

What will happen to our brother if he doesn’t exist? Bharat Gogawle’s attack on Sunil Tatkare

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023