विशेष प्रतिनिधी
बीड : Bhoi Pratishthan Pune : मागील काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रालाच झोडपून काढले असले तरी नेहमी प्रमाणेच याही वेळी मराठवाड्याच्याच वाट्याला जास्तीच दुख वाढले गेले. मराठवाडा अतिवृष्टीच्या तडाक्यात सापडला आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे , पिके उद्ध्वस्त झाली आहेत , गावेच्या गावे जलमय झाली आहेत , काही नागरिकांना तर हजारो जनावरांना जलसमाधी प्राप्त झाली आहे. रस्ते वाहून गेले आहेत, नदी नाले आपले पत्र सोडून वाहत आहेत , पूल वाहून गेले आहेत , गावांचा संपर्क तुटला आहे. माणसांचे बचावकार्य होत आहे परंतु पोटाच्या पोरांप्रमाणे जपलेल्या गुराढोरांना वाहून जाताना हतबलपणे पाहण्यावाचून शेतकर्यांकडे पर्याय उरलेला नाही. हि सगळी परिस्थिती पाहता सध्या मराठवाड्यात दोन पूर आल्याचे दिसत आहे एक पावसाच्या पाण्याने आलेला पूर आणि दुसरा असहाय पणे सगळा संसार वाहून जाताना पाहून आलेला आसवांचा पूर.
ह्या सगळ्या संकटाच्या काळात काही सेवाभावी संस्थांच्या वतीने मदतीचा हात दिला जात आहे. बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील राजेगाव, कवडगाव, शेलगाव, सुरडी, नजीक, रिधोरी, वाघोरा, माली, पारगाव, पुरुषोत्तमपुरी, किट्टी आडगाव या गावांना गोदावरी आणि सिंदफणा नद्यांना आलेल्या पुराने वेढा घातला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे तसेच शैक्षणिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बांधवांना तात्पुरत्या मदतीऐवजी कायमस्वरूपी भावनिक आणि मानसिक आधार देण्यासाठी भोई प्रतिष्ठानने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पांतर्गत पूरग्रस्त शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे (सोयाबीन, कापूस, गहू, हरबरा, तूर इत्यादी), खते, इतर शेती साहित्य आणि शैक्षणिक साहित्य पुरवले जाणार आहे. या उपक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विशेष सहकार्य लाभले आहे. विद्यापीठाचे असोसिएट डीन आणि शासकीय कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने यांनी या सेवाकार्यात सहभाग घेतला आहे.
भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई आणि डॉ. जनक चौरे, बीड यांनी पुणेकरांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आपला अन्नदाता असणाऱ्या बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,” असे त्यांनी सांगितले.
Bhoi Pratishthan in Pune extends a helping hand to flood-affected farmers
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…




















