विशेष प्रतिनिधी
पुणे : Vishwajit Kadam विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार सत्ताधारी पक्षातील आमदारच करत आहेत. राज्य सरकारमध्ये निधीचा मोठा गफला सुरू असल्याचे या तक्रारीवरून दिसते अशी टीका माजी मंत्री आणि काॅंग्रेसचे नेते डॉ.विश्वजीत कदम यांनी केली.Vishwajit Kadam
काॅंग्रेस पक्षाने खडकवासला इथे आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणी प्रशिक्षण शिबिरासाठी आले असता कदम बाेलत हाेते. ते म्हणाले, आमदार संजय गायकवाड यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली. गायकवाड सत्ताधारी पक्षातील आहेत. तेच नाही तर असे अनेक नाराज आमदार तिथे आहेत. सरकार सांगते आहे की अंदापत्रकात तरतुद केली आहे, मात्र तरतुद केली याचा अर्थ पैसे दिले असा होत नाही. त्यामुळेच हे पैसे मग जातात कुठे असा प्रश्न निर्माण होतो.Vishwajit Kadam
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रशासक आहेत. लोकप्रतिनिधी नाहीतच. पैसे येतात किती, जातात किती, कोणती कामे होतात याची सगळी माहिती फक्त प्रशासकाला असते. ते सरकारचे ऐकत असतात. यातून निधीचा मोठा गफला होत असल्याचा संशय निर्माण होतो असे कदम म्हणाले.विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण महाराष्ट्रातील स्थिती अवघड झाली आहे. प्रमूख रस्ते, जोड रस्ते खराब झाले आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही ते दुरूस्त होत नाहीत. निधी येतोय, मिळेल असेच सांगण्यात येते असा आराेप कदम यांनी केला.
Big embezzlement of funds in the state government, criticism from Vishwajit Kadam
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari : आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय, अमाेल मिटकरींचा राधाकृष्ण विखे- पाटील यांना धमकीवजा इशारा
- Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर
- मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात, आमदार परिणय फुके यांचा हल्लाबाेल
- cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय