विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील (Indrayani Riverbed) निळ्या पूर रेषेत उभारण्यात आलेल्या ३६ अनधिकृत बंगल्यांवर पालिकेने बुलडोझर चालवला. शनिवारी सकाळपासून पिंपरी- चिंचवड महापालिकेने कारवाई सुरु केले. हे सर्व बंगले जमिनदोस्त झाल्याने इंद्रायणी नदीपात्र मोकळे झाले.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली येथील इंद्रायणी नदी पात्रात उभारण्यात आलेल्या जवळपास ३६ बंगल्यांवर बुलडोझर चालविला . चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात झरे वर्ल्ड बिल्डरकडून निळ्या पूर रेषेत अनधिकृत ओपन प्लॉटिंग करण्यात आली होती.
रिव्हर व्हीला प्रोजेक्ट मध्ये एकूण 36 बंगले आहेत. पैकी 29 रहिवाशी न्यायालयात गेले होते. या ओपन प्लॉटिंगवर जवळपास ३६ जागा मालकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून आलिशान बंगले बांधले होते. हे बंगले नदीपात्रातील निळ्या पूर रेषेत अनधिकृत पणे उभारण्यात आल्याने या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालक हे राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
या खटलाच्या अंतिम निकालात सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे २०२५ पर्यंत सर्व अनधिकृत बंगले पाडून नदीपात्रातील भराव आणि राडारोडा पूर्णपणे उचलण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
Bulldozers on 36 bungalows built in the Indrayani riverbed in Chikhali
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?