विशेष प्रतिनिधी
पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवल्या प्रकरणी नीलेश घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले असून, बनावट पासपोर्ट मिळवून तो युरोपात गेल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.
या प्रकरणी नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच त्याला बनावट पासपोर्ट काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक माेहन जाधव यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.
घायवळ स्वित्झर्लंडला पसार:
कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार प्रकरणात घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. तो ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र मिळविले आहे. या पारपत्र प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून तपास करण्यात आला.
घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला . त्याने ९० दिवसांचा व्हिसा मिळविल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे . ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पासपोर्ट मिळवताना वापरले आहे. पुणे पोलिसांचे पथक अहिल्यानगरमध्ये गेले. त्याने पासपोर्ट मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे लक्षात आले.
घायवळ याचे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घर आहे. त्याचे घर आणि ऑफिसची झडती कोथरूड पोलिसांनी शनिवारी (४ ऑक्टोबर) घेतली होती. घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. पोलिसांनी घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी घायवळविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ५, ७, २५ (१), २७ (२) अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे नीलेश घायवळने पासपोर्ट मिळविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी घायवळ याच्याविरुद्ध पासपोर्ट ॲक्ट, आधार कार्ड ॲक्ट, तसेच फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घायवळ याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांविरुद्ध पोलिसंनी गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त
संभाजी कदम यांनी सांगितले.
Case filed against Nilesh Ghaiwal and two others who helped him in the fake passport case
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ