विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात राहू देणार नाही अशी धमकी देत पुणे महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनापरवानगी महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करून सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करून, पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांना ‘तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही’ असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला. सभागृहातून बाहेर आल्यानंतर काही जणांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून आत प्रवेश केला आणि आयुक्तांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी किशोर शिंदे, प्रशांत मते, नरेंद्र तांबोळी, अविनाश जाधव,महेश लाड यांच्यासह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 189(2) सहमहाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अमोल शिवाजी पवार (वय 35) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब झाल्याचा प्रकार समोर आला. यावरुन मनसे आक्रमक झाली. आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना आयुक्तांनी धमकी दिल्याचा आरोप मनसे नेते किशोर शिंदे यांनी केला होता.
मनसे कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळपासून महापालिकेत आंदोलन केले. महापालिका आयुक्तांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या बाहेर नेलं. यावेळी आंदोलकांनी आयुक्तलयाबाहेरही आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी त्यांना फरफटत नेत ताब्यात घेतले.
Case registered against MNS workers for obstructing government work
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!