विशेष प्रतिनिधी
पुणे : police inspector वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकाला धमकावणाऱ्या दोघा भावांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश पंडीत भालेराव (वय 30) आणि महेश पंडीत भालेराव (वय 27, दोघेही रा. माळेवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. police inspector
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा !
खराडी बायपास येथे रात्री उशिरापर्यंत अंडाभुर्जीची गाडी सुरू ठेवून योगेश भालेराव आणि महेश भालेराव हे दोघेजण खाद्यपदार्थाची विक्री करत असल्याचे आढळले. चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी त्यांना गाडी बंद करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी उर्मटपणे उत्तर देऊन ‘बघून घेईल’ असे म्हणत ढाकणे यांच्या वर्दीवर हात टाकला. तसेच नोकरी घालवण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास खराडी बायपास कॉर्नरला विशाल ट्रॅव्हल्स समोर घडला. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. police inspector
दरम्यान, पोलिसांची कारवाई अन्यायकारक आणि पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. या प्रकाराचे व्हिडीओ शूटिंग केल्यामुळे तरुणाच्या भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची कारवाई अन्यायकारक आणि पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.
योगेश पंडित भालेराव आणि त्याचा भाऊ महेश हे दोघेही अंडा भुर्जीची गाडी लावतात. शुक्रवारी रात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास. हे दोघेही त्यांची गाडी बंद करीत होते. त्यावेळी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दमदाटी करीत दुकान बंद करायला लावले. यामध्ये महिला पोलीस अधिकारी देखील होत्या. त्यावेळी पोलिसांनी अरेरावीची भाषा करीत दमदाटी करायला सुरुवात केल्याचा आरोप योगेश यांनी केला आहे. police inspector
पोलिसांनी योगेश यास ताब्यात घेऊन गाडीत बसवले. या प्रकारचे व्हिडीओ शूटिंग करीत असलेल्या महेशला देखील ताब्यात घेण्यात आले. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी यालाही ताब्यात घ्या रे असे म्हणत त्याला ताब्यात घेतले.
योगेश आणि महेश यांच्यावर पोलिसांनी पहाटे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अरेरावी केली असून विनाकारण त्रास दिला जात असल्याचा योगे यांनी आरोप केला आहे. यापूर्वी केलेल्या एका तक्रारीचा राग मनात धरून आपल्यावर ही कारवाई केली असून पोलीस आयुक्तांकडे याबाबत करणार तक्रार असल्याचे योगेश भालेराव यांनी सांगितले. police inspector
Case registered against two for threatening senior female police inspector
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल