विशेष प्रतिनिधी
पुणे : Ganeshotsav : गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्यांना भेट देण्यासाठी आणि गणपती दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते आज, रविवार (31 ऑगस्ट) पासून सायंकाळी 5 वाजल्यापासून वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. ही व्यवस्था 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जन सोहळ्यापर्यंत कायम राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहतुकीस बंद असणारे प्रमुख रस्ते:
लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते टिळक चौक
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता : गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक (स्वारगेट)
बाजीराव रस्ता: पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक
टिळक रस्ता: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक
अंतर्गत रस्ते: सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ).
एकेरी वाहतुकीत शिथिलता:
गणेशोत्सव कालावधीत (31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर) रात्री गर्दी ओसरेपर्यंत काही मार्गांवरील एकेरी वाहतुकीचे नियम गरजेनुसार तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येणार आहेत. यामध्ये कुमठेकर रस्ता, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते महापालिका कार्यशाळा (घोरपडे पेठ), आणि लष्कर भागातील कोहिनूर हॉटेल चौक ते भगवान महावीर चौक (महात्मा गांधी रस्ता) यांचा समावेश आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
वाहन पार्किंगवर निर्बंध:
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, आणि अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहने लावण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांचे आवाहन:
पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. “गणेशोत्सवात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे,” असे ते म्हणाले.
गणेशोत्सवाच्या या कालावधीत सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे वाहतूक पोलिसांनी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Central roads closed to traffic after 5 pm for Ganeshotsav, appeal to use alternative routes
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा