सोडून जाऊ नका म्हणत चंद्रकांत खैरेंचे कार्यकर्त्यांना व्यासपीठावर हात जोडून दंडवत

सोडून जाऊ नका म्हणत चंद्रकांत खैरेंचे कार्यकर्त्यांना व्यासपीठावर हात जोडून दंडवत

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर: मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सोडून जात असल्याने ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हात जोडून विनंती करत कार्यकर्त्यांना दंडवत घातले.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे मोठे धक्के बसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे गटाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका, असं म्हणत हात जोडून विनंती करत व्यासपीठावरच कार्यकर्त्यांना दंडवत घातलं.

खैरे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपल्याला आगामी महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार आहोत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तुम्हाला येथे दंडवत घालतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्याला पहायचं आहे.

आता परवाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे किती कळकळून बोलले. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, कुठेही सोडून जाऊ नका. आपण सर्वजण एकत्र मिळून अधिक चांगलं काम करू. समजा माझं काही चुकलं तर मला तुम्ही बोलले तरी काही हरकत नाही. पण माझी विनंती आहे की तुम्ही थांबा कुठेही जाऊ नका”, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत घातलं.

Chandrakant Khaire was praying to the workers with folded hands on the dais saying don’t leave

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023