विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. मात्र या संघर्षात भाजपने एक पाऊल पुढे टाकत आपला उमेदवार जाहीर केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद लाड यांच्या नावाची घोषणा करून सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. Sharad Lad
“ताकाला येऊन भांडं लपवण्यात काय अर्थ?” असे म्हणत पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शरद लाड हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, असे जाहीर केले. शरद लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे पुत्र आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. Sharad Lad
भाजपने अरुण लाड यांच्या पुत्राला आपल्या गोटात घेत राजकीय सर्जिकल स्ट्राईक केल्याचे मानले जात आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे झालेल्या भाजप कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी या उमेदवारीची घोषणा केली.
अरुण लाड हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजपने अरुण लाड यांच्या गडातच त्यांच्या मुलाला उमेदवार करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात फूट पाडण्याचा डाव आखला आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, ही चाल केवळ निवडणुकीपुरती नसून, पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा प्रभाव कमी करण्याच्या रणनीतीचा भाग आहे. भाजपचा हेतू राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर “घरातूनच घाव घालण्याचा” असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, अजित पवार गटाने या जागेवर दावा कायम ठेवला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच प्रताप उर्फ भैय्या माने यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही गट एकाच गठबंधनाचे भागीदार आहेत.
सध्या पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शरद पवार गटाचे अरुण लाड करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. भाजपने या वेळी ही जागा जिंकण्याचा निर्धार केला असून, पदवीधर मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही ही जागा राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसचे सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीसाठी मैदानात उतरवले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादीचा गड मानला जातो, परंतु या वेळी भाजपने लाड कुटुंबावरच डाव टाकल्याने समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, “शरद पवारांच्या गडातच त्यांच्या नातलगाला उमेदवारी देऊन भाजपने नवा राजकीय खेळ रंगवला आहे.”
Chandrakant Patil endorses Sharad Lad’s candidature in Pune Graduates constituency
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















