विशेष प्रतिनिधी
पुणे : Devendra Fadnavis भारतातील पहिल्या ‘UCI 2.2’ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन पुण्यात होत आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. पुणे ग्रँड टूर हे महाराष्ट्राच्या क्रीडा दृष्टिकोणाचे प्रतीक आहे. हा केवळ सायकलिंग इव्हेंट नसून, राज्याच्या अर्थ व्यवस्थेला चालना देणारा महत्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.Devendra Fadnavis
भारताच्या सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या (UCI लेव्हल २.२ स्टेज रेस) लोगो आणि जर्सी अनावरणाचा समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी पंकज सिंग, मनिंदर पाल सिंग, मनजीत सिंग जी.के., आणि ओंकार सिंह यांच्या उपस्थितीत आज पार पडला. त्यावेळी फडणवीस बोलत होते.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सायकलींचे शहर म्हणून पुणे शहराची एक ओळख होती. पुण्यात १९४५ सालापासून सायकल स्पर्धा सुरू झाल्या. अशा सायकलचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४३७ किमी अंतराच्या या स्पर्धेत मार्गावरील धार्मिक, सांस्कृतिक ऐतिहासिक पर्यटन स्थळे अधोरेखित होणार आहे.जगात सायकल हा स्टेटस सिम्बॉल बनला आहे. आजच्या वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा विविध अडचणीत सायकल चालविणाऱ्याकडे सन्मानाने पाहिले जात असल्याचे फडणवीस म्हणाले. आमचा उद्देश क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे आणि सायकलिंगसारख्या खेळांना नवसंजीवनी देणे आहे. या उपक्रमातून भारतातील तरुण सायकलपटूंना प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या नव्या राष्ट्रीय सायकलपटूंची निर्मिती होईल असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. सह्याद्रीच्या खडतर रस्त्यावरून २०० हून अधिक गावातून ही स्पर्धा जाणार आहे. त्यामुळे वेळेत सर्व रस्त्याची कामे तीही दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करावीत अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
या सायकलिंग इव्हेंट या उपक्रमातून १० हजार उद्योग निर्माण होऊन ८५० कोटींचा महसूल राज्याला मिळेल असेही पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या स्पर्धेच्या उदघाटन करिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा २०२८ मध्ये होणाऱ्या उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्रता फेरी म्हणून पपहिली पायरी ठरेल असे यावेळी रक्षा खडसे यांनी सांगितले. भारत हा क्रीडा पर्यटनात पुढे गेला पाहिजे व यात महाराष्ट्र व पुणे शहर अग्रभागी राहावे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुणे जिल्हा प्रशासन, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, पीएमआर डी ए, पुणे पोलीस आदी विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Cycling event boosts state’s economy, says Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















