विशेष प्रतिनिधी
नागपूर : Sushma Andhare शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपुर विमानतळावर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तिथुन जाणाऱ्या गाडीतून एका व्यक्तीने ही धमकी दिल्याचं सुषमा अंधारेंनी ट्विट केले आहे. सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पहावी अशी मागणी ही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.Sushma Andhare
अंधारे म्हणाल्या, मुलीला पुण्यात सोडवावं म्हणून मी विमानतळावर पोहोचले. तेव्हा समोरून अर्ध टक्कल, गोलाकार टिक्का लावलेला माणूस माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. ओळखीची व्यक्ती असेल म्हणून मी त्याच्याकडे बघितले तर तो मला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेटवरील सुरक्षारक्षक थोडे पुढे आले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत पुढे निघून गेला.