Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला आहे.

राज्याच्या सहकार क्षेत्रात नेहमीच चर्चेत असणारा बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांच्या या उमेदवारीबाबत त्यांचे विरोधक व कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उमेदवारीचे मी स्वागत करतो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळेल

अजित पवारांनी ज्या जागेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या ब वर्गामध्ये त्यांची ताकद अधिक आहे. त्यामुळे ते तेथून निवडून येतील. मात्र त्यासाठी आमचाही उमेदवार ताकदीनेने निवडणूक लढवेल. मात्र बिनविरोध होऊ देणार नाही.

नुकत्याच झालेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील ‘श्री जय भवानी माता’ पॅनलने दणदणीत विजय मिळवला. अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती झाल्यामुळे निवडणूक एकतर्फी झाली. सभासदांनी पवार -जाचक यांच्या युतीच्या पॅनेलवर विश्‍वास दाखवत श्री जय भवानीमाता पॅनेलकडे एकहाती सत्ता दिली होती. माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. Ajit Pawar

 

Deputy Chief Minister Ajit Pawar will contest from Malegaon, opposition warns that they will not allow him to be elected unopposed

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023