विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आता माझा पिच्छाच सोडत नाही. पण हल्ली चांगल्या अर्थाने हे वाक्य म्हणतात. मागच्या काळात हे उपहासाने म्हटले जायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ बदलत असतात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे खुमासदार शैलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीआवाहन केले.
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, उदय सामंत तुम्ही म्हणालात की, काही लोकांनी वाद तयार केले, उदयजी मी तुम्हाल सांगू इच्छितो की, साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो. विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही, तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे. आपण संवेदनशील लोक आहोत. वाद-विवाद, प्रतिवाद झाला पाहिजे. त्यातून खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकतं, हे मी म्हणत नाही. आठव्य शतकात कुवलय माला नावाच एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात मराठीमाणसाचे वेगवेगळे गुण-अवगुण सांगितले आहेत. त्यात एक चॅप्टर आहे, मराठी माणसाला कलह करायला आवडतो, असं आठव्या शतकात लिहून ठेवलय. त्यामुळे तुम्ही फार काळजी करु नका. अशा प्रकारची संमलेन आपण करत रहायची. कुणी नाव ठेवेल, कुणी चांगलं म्हणेल. त्यातून मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती, बुद्धी मिळते.
जगभरात असा एकही देश नाही, जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. कोणत्याही देशात आम्ही दौऱ्यासाठी गेलो तरी तिथे स्वागतासाठी मराठी माणसे लांबून लांबून येतात. हे बघून अतिशय आनंद वाटतो. नुकतेच दावोसला गेलो असताना तिथे काही मराठी मंडळींनी माझे स्वागत केले. एका लहान मुलाने “लाभले आम्हास बोलतो मराठी…”, हे गाणं सुंदर पद्धतीने सादर केले. त्यात त्याने मी पुन्हा येईन.. असेही म्हटले”, अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
Devendra Fadnavis says ‘I will come again’ does not leave my back
महत्वाच्या बातम्या