राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र सहकार्यवाह धनंजय घाटे यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र सहकार्यवाह धनंजय घाटे यांचे निधन

Dhananjaya Ghate

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह धनंजय रामचंद्र घाटे (वय ५३) यांचे आकस्मित निधन झाले. जनसेवा बॅंकेत ते अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी मनिषा, आई-वडील, मुलगा ज्ञानेश, भाऊ धीरज घाटे, बहिण धनश्री असा परिवार आहे.त्यांच्यावर आज (३०) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बालपणापासून संघ स्वयंसेवक असलेले धनंजय घाटे १९९० ते ९५ या काळात मराठवाड्यातील भूम, कळंब येथे तालुका प्रचारक व धाराशिव येथे जिल्हा प्रचारक होते. २०११ मध्ये पुणे महानगर सहकार्यवाह आणि २०१८ पासून प्रांताचे सहकार्यवाह म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती.

विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांशी दांडगा त्यांचा संपर्क होता. शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी रमणबाग शाळेत संध्याकाळी सात वाजता श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

Dhananjaya Ghate passed away

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023