विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Metro शहरातील बहुतांश नागरिक हे आता मेट्रोचा वापर रोजच्या जीवनात करत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी बघता लोकं आता सर्रास मेट्रोचा पर्याय निवडतांना दिसत आहेत. यामुळेच आता मेट्रोचे जाळे हळू हळू विस्तारत आहे. याचाच भाग म्हणून आता पुणे मेट्रोचा ‘फेज-२’ सुरू होणार आहे. ज्याचा विस्तार हा खडकवासला ते खराडी इतका असणार आहे.
प्रवाशांची वाढती मागणी आणि त्यांनी आत्तापर्यंत मेट्रोला दिलेला प्रतिसाद यामुळे पुणे मेट्रो आता आणखी नवीन मार्गांवर देखील मेट्रोचा विस्तार करणार आहे. या सर्व सेवा सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी पुणे मेट्रोने पुणे मेट्रो रेल प्रकल्पांच्या नवीन मेट्रो मार्गांवर ‘ड्रायव्हरलेस’ किंवा ‘अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन’ (यूटीओ मोड) सुरू करण्याची योजना आखली आहे. Pune Metro
दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या प्रमुख भारतीय शहरांमध्ये नवीन आणि येणाऱ्या मेट्रो मार्गांमध्ये यूटीओ ऑपरेशन्स सर्रास वापरले जात आहेत. ड्रायव्हरलेस मेट्रो ऑपरेशन्स मानवी चुका कमी करण्यास, गाड्या वेळेवर पोहोचण्यास आणि मेट्रो सेवांचा दर्जा वाढविण्यास मदत करू शकतात. ते विश्वासार्हता आणि सेवा कार्यक्षमता देखील वाढते.
महा-मेट्रोचे सिस्टिम्स अँड ऑपरेशन्स संचालक विनोद अग्रवाल यांच्या मते, पुणे मेट्रोकडून चालकविरहित ट्रेन प्रणालींचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सर्वसमावेशक खर्चाचे मूल्यांकन करण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती केली जाईल. सध्या, अटेंडेड ट्रेन ऑपरेशनमध्ये ड्रायव्हर्सचा समावेश आहे. जे मेट्रो रेल्वे सुरू करतात, त्याचे ऑपरेशन व्यवस्थापित करतात आणि गाडीत असणारी नियंत्रणे वापरून ट्रेनचे दरवाजे बंद करतात, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मात्र यूटीओ प्रणाली यापेक्षा अधिक विश्वासार्ह आहे. Pune Metro
तंत्रज्ञानाने प्रगत असलेली यूटीओ प्रणाली किंवा ड्रायव्हरलेस प्रणाली मानवांपेक्षा अधिक विश्वासार्ह आहे आणि ड्रायव्हर्ससाठी असलेले केबिन काढून टाकल्याने प्रवाशांसाठी जागा देखील वाढवता येईल, हे देखील अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले.
अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, दुसऱ्या टप्प्यासाठी नियोजित मेट्रो मार्गांवरच ड्रायव्हरलेस सिस्टम लागू केली जाईल, कारण त्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि सिग्नलिंगने सुसज्ज असलेल्या गाड्यांची आवश्यकता आहे. येत्या काही वर्षांत प्रणाली अपग्रेड झाल्यानंतर फेज १ मधील सध्याचे मेट्रो रेल मार्ग देखील ड्रायव्हरलेस मोडमध्ये बदलतील. Pune Metro
सध्या महा-मेट्रो पुणे, मेट्रो लाईन १ चे व्यवस्थापन करते, जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते स्वारगेट पर्यंत जाते आणि लाइन २, जी वनाझ ते रामवाडी पर्यंत जाते. दरम्यान, शिवाजीनगर ते हिंजवडी पर्यंत पसरलेली पुणे मेट्रो लाईन ३ पीएमआरडीए द्वारे विकसित केली जात आहे. Pune Metro
‘Driverless’ trains to run in Pune Metro Phase 2
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















