Eknath Khadse एकनाथ खडसे यांनी पोलिसांना विचारली रेव्ह पार्टीची व्याख्या

Eknath Khadse एकनाथ खडसे यांनी पोलिसांना विचारली रेव्ह पार्टीची व्याख्या

विशेष प्रतिनिधी

पुणे : सात जणांची पार्टी सुरु होती, तिथे संगीत नाही, डान्स नाही, फक्त सात जण एका घरात बसले आहेत. त्याला रेव्ह पार्टी म्हणता येईल का? याला जर रेव्ह पार्टी म्हणायचे असेल तर राज्यात कुठेही कोणीही घरात पाच-सात जण पार्टीला बसले तर त्याला रेव्ह पार्टी म्हणावे लागेल. मला पोलिसांना रेव्ह पार्टीची व्याख्या विचारायची आहे. रेव्ह पार्टी सांगून पोलिसांनी बदनामी करण्याचे काय प्रयोजन होते, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी एका फ्लॅटवर छापा टाकला होता. या फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी या फ्लॅटमधून पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. पण या प्रकरणावरून आता एकनाथ खडसे यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून पोलिसांनी मला रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या सांगावी, असे खडसेंनी म्हटले आहे.

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचे नाव समोर आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.



यावेळी ते म्हणाले की, 27 जुलै रोजी सकाळी पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला आणि एकनाथ खडसेंचे जावयांना अटक केल्याची बातमी तुम्हाला सर्वांना माहिती असेल. माझ्या मनात पुणे पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न आहेत. पोलिसांना अशाप्रकारे कोणाचेही चेहरे, विशेषत: महिलांचे चेहरे दाखवण्याचा अजिबात अधिकार नाही. मात्र, पोलिसांनी पुरुष आणि महिलांचे फोटो दाखवून त्यांची बदनामी केली. तसचे प्रांजल खेवलकर यांना एक नंबरचा आरोपी करण्याचे कारण काय, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला.

प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर आयुष्यात एकही गुन्हा दाखल नाही. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. ते वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. ज्याठिकाणी पोलिसांनी अंमली साठा सापडला तो एका मुलीच्या पर्समध्ये सापडला, हे पोलिसांच्या व्हिडीओत दिसत आहे. त्या मुलीलाही हे माहिती नाही, असे ती म्हणत आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी तिला पहिल्या क्रमांकाची आरोपी करायला पाहिजे होते. प्रांजल खेवलकर आणि इतरांनी कोणताही अंमली पदार्थ बाळगला नव्हता. मग तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करून पोलिसांनी इतरांना साक्षीदार केले पाहिजे होते. मात्र, पोलिसांनी प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी का केले? असा सवाल उपस्थित करत खडसेंनी हे कुटुंबाला बदनाम करण्याचे कृत्य असल्याचे म्हटले आहे.

Eknath Khadse asked the police for the definition of a rave party

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023