विशेष प्रतिनिधी
पुणे : Pankaja Munde मी सर्वच राजकीय पक्ष घराण्यांच्या जवळ आहे. माझे वडील गोपीनाथ मुंडे यांची ही पुण्याई आहे. मात्र, आता कोणी एकत्र यावे न यावे, याबाबत सल्ला देण्याएवढे माझे वय नाही. मी सल्ला किंवा सूचना देण्याच्या भूमिकेत नाही. सर्व जण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित राहावे एवढीच अपेक्षा आहे, असे मत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. Pankaja Munde
पुण्यात पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यास गुरुवारी (दि. १५) सुरुवात झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना मुंडे भाऊ बहीण एकत्र आले तसेच पवार आणि ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले.
मुंडे म्हणाल्या, पशुसंवर्धन विभागात आता समुपदेशनाने बदल्या झाल्या आहेत. यातून अधिकाऱ्यांना समान अधिकार मिळणार आहेत. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. तसेच बदल्यांचा हा पॅटर्न कायम ठेवणार आहे. यामध्ये बदलीपात्र अधिकाऱ्यांचे समुपदेशन करून सुमारे ५५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांनी दुर्गम आदिवासी भागात बदली मागितली होती. अशी माहिती त्यांनी यावेळी यांनी दिली. हा विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होण्यासाठी लवकरच काही योजना आणणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
मुंडे म्हणाल्या, पशुसंवर्धन हा विभाग ग्रामीण आणि शहरी भागाशी निगडित विभाग आहे. तसेच हा विभाग उद्योजकांचा विभाग आहे. यामध्ये डेअरी, फिशरी, पोल्ट्री आदी व्यवसायांचा संबंध येतो. मात्र, तरीही हा विभाग जरासा दुर्लक्षित असून, विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होण्यासाठी लवकरच योजना आणणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योजनेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, त्यांनाही योजना आवडलेली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात योजना जाहीर करू.
Everyone should stay in their respective places, Pankaja Munde’s opinion on the discussion of party merger
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?