विशेष प्रतिनिधि
पुणे : गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभाग विशेष मोहीम राबविणार आहे. यासाठी ‘एफडीए’ने आत्तापर्यंत जिल्ह्यात 35 अन्न आस्थापनांच्या तपासण्या केल्या आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच एफडीए कायद्याप्रमाणे कारवाई करणार आहे. Pune
गणेशोत्सव नवरात्र किंवा दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात विविध प्रकारच्या अन्नपदार्थांच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होते. विशेषतः मिठाईच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी बघायला मिळते. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन विक्रेत्यांकडून कमी दर्जाचे, शिळे तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होण्याची दाट शक्यता असते. परंतु, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे दरवर्षी ‘एफडीए’कडून आस्थापनांची तपासणी करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. Pune
त्यानुसार 11 ऑगस्ट पासून ते आज पर्यंत एफडीएने जिल्ह्यात एकूण 35 अन्न आस्थापनांच्या तपासण्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्नपदार्थ व मिठाईचे 65 नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत व याबाबतचे अहवाल प्राप्त होताच त्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाणार आहे. केवळ हीच नाही तर गणेशोत्सव व आगमी सणासुदीच्या काळात देखील ही धडक कारवाई सुरूच राहणार आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जाणार आहे. ही मोहीम पुणे कार्यालयातील सर्व अन्नसुरक्षा अधिकारी व सहाय्यक आयुक्तांमार्फत पार पाडली जाणार आहे.
तसेच अन्नपदार्थांमध्ये भेसळी संदर्भात अथवा इतर कोणत्याही बाबतीत काही संशय असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाला संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. Pune
FDA campaign in Pune for adulteration-free prasad
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा