विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील एच.एन.डी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात गोखले लँडमार्क्स एलएलपीचे भागीदार विशाल गोखले यांनी स्मारक ट्रस्टकडून २३० कोटी रुपयांचा व्यवहार रद्द करण्याची आणि रक्कम परत देण्याची मागणी करत या व्यवहारातून औपचारिक माघार घेतली आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उशिरा रात्री पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट इशारा दिला की, “विक्री व्यवहार पूर्णपणे रद्द होईपर्यंत लढा सुरू राहणार आहे.” Raju Shetti
रात्री ११.३० वाजता पत्रकारांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, “बिल्डर विशाल गोखले यांनी या व्यवहारातून माघार घेतली असली आणि ट्रस्टला विक्री व्यवहार रद्द करण्याची विनंती केली असली, तरी लढा संपलेला नाही. धर्मादाय संस्थेच्या जमिनीची विक्री ही श्रद्धा आणि परंपरेचा अपमान आहे. जोपर्यंत विक्री दस्तऐवज कायदेशीररीत्या रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.” Raju Shetti
दिवसभरात ८६ हून अधिक जैन संघटनांनी एकत्र येऊन या विक्रीविरोधात एकमताने ठराव मंजूर केला होता. ट्रस्टींचा निर्णय “बेकायदेशीर आणि अस्वीकार्य” असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले. तसेच, जर विक्री रद्द झाली नाही, तर देशव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
राजू शेट्टी म्हणाले, एकमताने ठरलं होतं ज्यांनी व्यवहार केला त्यांनी विनंती करावी. आम्ही एक इंचही जमीन देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही गोखले बिल्डर आणि केंद्रीय राज्य मंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना भेटून व्यवहार रद्द करण्याची विनंती केली होती. मोहोळ यांचा फोन आला जे बैठकीत ठरलं आहे त्याचा आदर करून आम्ही संपूर्ण व्यवहार रद्द करू. तसा मेल केला आहे. पण त्यांनी पत्र दिल म्हणजे आम्ही समाधानी नाही. या मालमत्ता वर गोखले यांच नाव आहे,जोपर्यंत व्यहर रद्द होऊन ट्रस्टचे च नाव लागत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. कटुता टाळायची असेल ते सर्वांनी पुढाकार घ्यावा तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार. केवळ पत्रावर आम्ही समाधानी नाही. देशात मूक मोर्चे निघणार,आंदोलन सुरू राहणार गोखले बिल्डर यांनी जे पाऊल टाकलं आहे त्याच स्वागत करतो असे सांगून राजू शेट्टी म्हणाले,
ताबडतोब हा व्यवहार रद्द करून ती रक्कम परत द्या. हा व्यवहार रद्द करून त्याचे परत पैसे द्या. पुण्यातील शताब्दीपूर्ती असलेले जैन बोर्डिंग हे शहरातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते. जैन आचार्यांसह समुदाय नेत्यांनी देखील इशारा दिला आहे की, सरकारने तातडीने कारवाई केली नाही, तर ते उपोषणाला बसतील.
दरम्यान, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी ट्रस्टला लिहिलेल्या पत्रात गोखले यांनी “नैतिक आणि सामाजिक कारणांमुळे” हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. त्यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विक्री करार आणि पावर ऑफ अॅटर्नीचे रद्दबातल पत्र (कॅन्सलेशन डीड) तयार करण्याची विनंती केली आहे.
भांबुर्डा, शिवाजीनगर येथील ट्रस्टच्या मालकीची ही जागा विक्रीसाठी दिल्याने मागील काही आठवड्यांपासून मोठे वादळ उठले होते. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या व्यवहाराशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पतसंस्थांनी केलेल्या गहाणखत रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर व्यवहारातील अनियमितता उघड केली होती.
गोखले यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले की, या प्रकरणातील कायदेशीर आणि सामाजिक गुंतागुंत लक्षात घेऊन त्यांनी ट्रस्टच्या प्रतिष्ठेचा सन्मान राखत हा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्रस्टचे योगदान “दीर्घकाळ समाजकार्यासाठी केलेले मोलाचे कार्य” असल्याचे नमूद केले आहे.
Fight Will Continue Until the Jain Boarding Land Sale Is Cancelled,” Warns Raju Shetti
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















