विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Municipal Corporation पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे. तब्बल ५९२२ हरकती आणि सुचना प्राप्त झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.Pune Municipal Corporation
संपूर्ण शहरातून आलेल्या ५९२२ हरकतींपैकी, १३२९ हरकती पूर्णतः मान्य करण्यात आल्या. ६९ अंशतः मान्य झाल्या तर ४५२४ हरकती अमान्य झाल्या. मुख्य हरकती प्रभाग क्रमांक १, ४, १४, १५, १७, १८, २०, २४, २६, २७, ३४, ३८, ३९ या भागांवर केंद्रित होत्या.
अंतिम मंजुरीनंतर ८ प्रभागांचे नाव आणि क्षेत्ररचना बदलण्यात आली आहेत. यामुळे परिसरातील राजकारण बदलणार आहे.Pune Municipal Corporation
क्र. जुने प्रभाग नाव नवीन प्रभाग नाव
१ कळस – धानोरी कळस धानोरी – लोहगाव उर्वरित
२ कोरेगाव पार्क – मुंढवा कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवा
३ मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी मांजरी बुद्रुक – केशवनगर – साडेसतरा नळी
४ रामटेकडी – माळवाडी रामटेकडी – माळवाडी – वैदुवाडी
५ बिबवेवाडी महेश सोसायटी शंकर महाराज मठ – बिबवेवाडी
६ कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – के.ई.एम. हॉस्पिटल
७ गुरुवार पेठ – घोरपडे पेठ घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समताभूमी
८ आंबेगाव – कात्रज बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज
नव्या रचनेनुसार पुणे महानगरपालिकेत १६५ नगरसेवकांची निवड होणार असून, यंदा निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. महानगरपालिका निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले, “नागरिकांच्या हरकतींचा बारकाईने विचार करण्यात आला असून, न्याय्य पद्धतीने अंतिम रचना निश्चित केली आहे.”
राज्य निवडणूक आयोग लवकरच अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट प्रकाशित करणार आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज होणार आहेत.
Final Approval Granted for Pune Municipal Corporation’s Ward Structure! 5,922 Objections Reviewed, 8 Wards Renamed and Reconstituted
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ