विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील पहिले ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. महायुती सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे, हे विद्यापीठ अत्याधुनिक संशोधन आणि कौशल्य विकासासाठी केंद्रस्थानी राहील. इतकेच नाही, तर हे विद्यापीठ भारतीय तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत नेतृत्व करण्यासाठी तयार करेल, असेही त्यांनी सांगितले.
गतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आशिष शेलार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे., विकसित भारत २०४७” मिशनची यशस्वी पूर्तता आणि भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योग आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणारे हे विद्यापीठ असेल.
सरकार लवकरच देशातील पहिले राज्य-स्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर धोरण जाहीर करणार आहे., यासाठी एक विशेष टास्कफोर्स स्थापन करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली या धोरणाचा आराखडा तयार होईल. तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असेल, आमचे सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नवसंकल्पनांच्या संधी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणात परिवर्तन घडवून, भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे शेलार यांनी सांगितले.
First Artificial Intelligence University in Maharashtra, Information and Technology Minister Ashish Shelar announce
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार