विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना पुणे सत्र कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रविवारी पहाटे खराडी येथील एका पार्टीतून प्रांजल खेवळकर यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली होती. यात दोन महिलांचा देखील समावेश होता. या दोन महिलांनीच कट रचून प्रांजल खेवलकर यांना अडकवल्याचा आरोप केला जात आहे. प्रांजल खेवलकर यांना यापूर्वी दोनदा दोन दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आज गुरुवारी प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.