विशेष प्रतिनिधी
पुणे : Suresh Kalmadi माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगून चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.Suresh Kalmadi
गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब असल्याची माहिती मिळत होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. जवळपास २० मिनिटे शरद पवारांनी कलमाडींशी चर्चा केली होती.Suresh Kalmadi
कधी काळी पुणे महानगर पालिका म्हणजे सुरेश कलमाडी असंच समीकरण मांडलं जायचं. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडींचं नाव मोठं होतं. पण २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भ्रष्टाचार प्रकरणात सुरेश कलमाडींचं नाव आलं आणि सगळी गणितंच बदलली.Suresh Kalmadi
सुरेश कलमाडींना या प्रकरणी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने कारावासाची शिक्षा देखील सुनावली होती. या प्रकरणी कलमाडींनी ९ महिने कारावास देखील भोगला होता.
या प्रकरणामुळे तत्कालीन यूपीए अर्थात काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारची बरीच नाचक्की देखील झाली. त्यानंतर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान सुरेश कलमाडींचं नाव आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा भ्रष्टाचार प्रकरणावरून तत्कालीन केंद्र सरकारला लक्ष्य देखील करण्यात आलं होतं.
Former Minister Suresh Kalmadi’s health deteriorates, admitted to hospital
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!