विशेष प्रतिनिधी
पुणे, MLA Prakash Deole दि. 23 (प्रतिनिधी) शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगाव चे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या बुधवार (दि 24 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.MLA Prakash Deole
कट्टर शिवसैनिक असलेले प्रकाश देवळे हे शिवसेनेतर्फे 1996 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. शिरगाव शिर्डी येथे त्यांनी साईबाबांची प्रतिशिर्डी उभी केली. अन्नछत्र उभारले. अनेक संस्था आणि संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता.
Former Shiv Sena MLA Prakash Deole passes away Funeral today afternoon
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















