विशेष प्रतिनिधी
पुणे : आंदेकर-कोमकर टोळी युद्धामधून पुन्हा एकदा एकाचा बळी गेला. वनराज आंदेकर खून प्रकरणातील एका गुंडाच्या भावाचा गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना कोंढवा येथील खडी मशीन चौकात शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेश हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ असल्याची प्राथिमक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. पुण्यात गणेश काळे याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्यावर्षीय वनराज यांचा गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत खून केला होता. वनराज यांच्या खूनात वापरलेली पिस्तूले समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते.
आज दुपारी पावने चार वाजताच्या सुमारास गणेश हा आपल्या रिक्षातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात गणेशविसर्जनाच्या पुर्वसंध्येला गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा आंदेकर टोळीने खून केला होता. त्यानंतर आता समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा खून झाला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवार तर भडकले नाही ना असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
Gang War Erupts Again in Pune: Ganesh Kale Shot Dead in Andekar–Komkar Rivalry
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















