विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : केसगळती सुरू होऊन टक्कल पडण्याचा रोग वाढतच चालला आहे. शेगावातील 16 गांवात आता हा अनामिक रोग पसरला आहे.
शेगाव कालवड, बोंडगाव, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजिनाथ, घुई, माटरगाव, पहुजीरा व निंबी तर नांदुरा तालुक्यातील वाडी, अशा १३ गावांमध्ये रुग्ण सापडले होते. आता शेगाव तालुक्यातील कनारखेड गायगाव आणि वरखेड येथेही रुग्ण आढळून आले. परिणामी बाधित गावांची संख्या १६ झाली आहे.
पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी ही केसगळती ‘सेलेनियम’मुळे झाल्याचे सांगितले. रुग्णांच्या शरीरातील सेलेनियमचे प्रमाण सामान्य स्थितीच्या तुलनेत १० पट जास्त असल्याने केस गळत असल्याचे ते म्हणाले.
गेल्या महिन्यापासून शेगाव तालुक्यातील तीन चार गावांत या अनामिक आजाराचे रुग्ण आढळून आले. दुहेरी आकड्यात असलेल्या या टक्कलग्रस्त रुग्णसंख्येने पाहतापाहता शंभरचा आकडा पार केला. गावांची संख्या वाढली, शेगावच्या सीमा ओलांडून नांदुरा तालुक्यातही आजार पसरला. जानेवारीअखेर रुग्णसंख्या २४६ वर गेली होती.
Hair loss continues, baldness does not stop, anonymous disease spread in 16 villages of Shegaon
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन