जिथे दिसेल तिथे ठेचा, त्याला गाडा, गोळ्या घातल्या पाहिजेत, उदयनराजेंचा राहुल सोलापूरकरांवर संताप

जिथे दिसेल तिथे ठेचा, त्याला गाडा, गोळ्या घातल्या पाहिजेत, उदयनराजेंचा राहुल सोलापूरकरांवर संताप

विशेष प्रतिनिधी

सातारा : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले चांगलेच भडकले आहेत. राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालूनच मारलं पाहिजे. जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत बोलताना आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती असे विधान केले होते. युमुके त्यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

उदयनराजे म्हणाले, केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होतात. काय असं विधान केलं. हा राहुल सोलापूरकर कोण आहे. तो जो म्हणाला लाच. जे लाच घेतात यांना लाचे पलीकडे काही समजत नाही. असं बोलतांना जिभेला हाड नसतं माहीत आहे. लावली जीभ टाळूला काहीही बोलायचं. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजे. महापुरुषांबद्दल अशी विधानं करतात अशा लोकांना दिसेल तिथे ठेचलं पाहिजे. वेचून ठेचलं पाहिजे. अशा विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मात अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होते.

सोलापूरकर यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना भेटणार आहे. अशी विधाने करणार्‍यांवर कडक कारवाई करावी. देशद्रोहाचा कायदा त्यांच्यावर लागू केला पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.

शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. विकृत विधाने करणार्‍यांना थांबवलं पाहिजे. त्यांचे सिनेमे बंद केले पाहिजे. निर्माते, दिग्दर्शकांनीही अशा लोकांना थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

मला विचारलं तर त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे जे लोकं असतील त्या सर्वांना गोळ्या घातल्या पाहिजे. कुणीही बेताल विधाने करायची. जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराज पुढे गेले. अशा महापुरुषांबद्दल अशी विधाने होत असतील तर दुसरा काही पर्याय नाही. तो जिथे दिसेल त्याचा ठेचा आणि गाडा, असे आवाहन त्यांनी केले.

He should be beaten wherever seen, buried, shot, Udayanraj’s anger at Rahul Solapurkar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023