विशेष प्रतिनिधी
पुणे : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी झालेल्या स्फोटानंतर पुणे शहरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या सरकारी व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आणि स्थानिक पोलिसांनी शहरातील रेल्वे स्थानके, विमानतळ, बसस्थानक, मॉल्स आणि गर्दीची ठिकाणे येथे गस्त वाढवली आहे. प्रत्येक प्रवाशांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येत असून स्निफर डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब डिटेक्शन टीम्स तैनात केल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “देशात कुठेही अशी घटना घडली की पुणे ही एक संवेदनशील शहरे म्हणून नेहमीच सतर्क राहते. सध्या कोणताही धोका नसला तरी सर्व सुरक्षा उपाय वाढवण्यात आले आहेत.”
दरम्यान, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफकडून तपासणी प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे, तर रेल्वे स्थानकांवर प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची तपासणी सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत वस्तू, पिशव्या आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, “कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाला कळवावी.”
High alert in Pune after Delhi blast! Security tightened at railway stations, airports and important places
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत लाल किल्ल्यापासल्या स्फोटात 7 गाड्या उद्ध्वस्त; दहशतवादी हल्ल्याचा संशय गडद!!
- Dr. Sampada Munde; : डॉ. संपदा मुंडेंना न्याय देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक, मरीन ड्राईव्हवर रास्ता रोको, गिरगाव चौपाटीवर आंदोलन
- Jaykumar Gore : हिम्मत असेल तर समोर या! रोहित पवार यांचे जयकुमार गोरे यांना खुले आव्हान
- Cracks in Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत फूट, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय



















