विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी पसरविलेला भ्रम दूर करून रामजन्मभूमीच्या आंदोलनात मोठी भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी जैन यांना यांचा मोदी सरकारने राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करून सन्मान केला आहे.
प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. मीनाक्षी जैन यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली. भारतीय इतिहास, सभ्यता, धर्म आणि राजकारण विषयांवर सखोल संशोधन करणाऱ्या डॉ. जैन यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गर्गी कॉलेजमध्ये इतिहासाच्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून सेवा बजावली आहे.
त्यांची राज्यसभेतील नियुक्ती ही भारतीय दृष्टिकोनातून इतिहास संशोधन करणाऱ्या विचारवंतांच्या सन्मानाची मोठी पावती मानली जात आहे. २०२० मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवले. त्यांच्या काही पुस्तकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमातही करण्यात आला आहे.
डॉ. जैन या नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय तसेच भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यही राहिल्या आहेत. सध्या त्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेच्या वरिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत आहेत. मध्ययुगीन आणि अर्वाचीन भारतातील सांस्कृतिक व धार्मिक घडामोडी हे त्यांचे प्रमुख संशोधन विषय आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय ऐतिहासिक ग्रंथांमध्ये Flight of Deities and Rebirth of Temples (2019), The Battle for Rama: Case of the Temple at Ayodhya (2017), Sati: Evangelicals, Baptist Missionaries and the Changing Colonial Discourse (2016), Rama and Ayodhya (2013), आणि Parallel Pathways: Essays on Hindu–Muslim Relations (1707–1857) (2010) यांचा समावेश आहे.
डॉ. मीनाक्षी जैन यांनी Rama and Ayodhya (2013) आणि The Battle for Rama (2017) या ग्रंथांमधून ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे अयोध्येतील राम मंदिराचा दावा स्पष्ट केला. त्यांनी डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी मुद्दाम पद्धतीने ऐतिहासिक पुरावे बाजूला ठेवून बाबरी मशिदीच्या जागेचा हिंदू मंदिराशी असलेला संबंध झाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे दाखवले. ब्रिटिश काळापर्यंत त्या जागेला ‘रामजन्मभूमी’ म्हणून मान्यता होती हेही त्यांनी दाखवून दिले.
तसेच, डॉ. जैन यांचे म्हणणे आहे की अनेक मुस्लीम नेत्यांनी देखील राम मंदिराची जागा हिंदूंना सुपूर्त केली पाहिजे असे मत मांडले होते. मात्र, डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी मुस्लीम समाजात भ्रम निर्माण करून हा वाद चिघळवत ठेवला.
डॉ. मीनाक्षी जैन यांचे २०२४ मध्ये प्रकाशित झालेले नवीन पुस्तक Vishwanath Rises and Rises हे काशीच्या (वाराणसी) इतिहासावर आधारित आहे. यामध्ये त्यांनी प्रारंभीच्या इस्लामी आक्रमणांपासून १६६९ मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त करण्यापर्यंतच्या घडामोडींचा तपशीलवार आढावा घेतला आहे. हिंदू समाजाने सतत काशीमध्ये आपले मंदिरे पुन्हा उभारण्याचा केलेला संघर्ष, अहिल्याबाई होळकर व मराठ्यांनी केलेले मंदिर पुनर्निर्माणाचे प्रयत्न, यांचा यात उल्लेख आहे.
डॉ. मीनाक्षी जैन यांच्या अभ्यासपूर्ण व स्वदेशी दृष्टिकोनातून मांडलेल्या ऐतिहासिक लेखनामुळे राष्ट्रीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांना न्याय मिळत असल्याचे मानले जात आहे. राज्यसभेत त्यांच्या सहभागामुळे ऐतिहासिक दृष्टिकोनाचे वैविध्य अधिक स्पष्टपणे मांडले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Honor to the historian who erased the history of leftist ideology in the Ram Janmabhoomi movement
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार