विशेष प्रतिनिधी
नाशिक : मी मटन खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते. मी रामकृष्ण हरी वाली आहे, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातोय आणि आपल्या पैशाने खातोय, दुसऱ्याचं काही उधार नाही. जे आहे ते आपले आहे. आपण कुणाला मिंधे नाही. जे आहे डंके की चोट पे करते है…खातो तर खातो, नेमकं कुठे जेवायला गेले, तेवढेच व्हायरल केले. खाल्लं खाल्लं त्यात काय पाप केले का? उघड खाते, फक्त माळ घालत नाही. खाण्याचा मोह होतो म्हणून घालत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही. मी ज्या दिवशी माळ घालेन तेव्हा समजायचं मटण सोडून दिले. Supriya Sule
सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात ओला दुष्काळ झाला, तुम्ही तो जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करा या मागणीसाठी मी अमित शाहांना भेटले. दुसरे कुणी गेले का? गृहमंत्री म्हणून नव्हे तर सहकार मंत्री म्हणून त्यांच्याकडे गेले. एकजण त्यांना भेटायला गेले नाही. मुख्यमंत्री मला वेळच देत नाही. दहा वेळा भेटीची वेळ मागितली. माणूस वेळ देत नाही. याचा अर्थ काय तर सुप्रिया सुळेंना वेळ द्यायचा नाही. तुम्ही माझी कामे करत नाही ना, मग माझी कामे दिल्लीतून होतात. सगळी कामे दिल्लीतून होतात.
देशात लोकशाही टिकली पाहिजे, त्यासाठी ३०० खासदार रस्त्यावर उतरले होते. ही लढाई वैयक्तिक नाही तर वैचारिक आहे. आमच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, देशात जे योग्य असेल ते मी बोलणार, ते तुम्हाला मान्य नसेल तर खुशाल गुन्हा दाखल करा, मला अटक करा. टीका करायची तर अभ्यास करून करा. सशक्त लोकशाहीत आम्हालाही लोकांच्या मागणी मांडण्याचा अधिकार आहे. दिल्लीत विरोधकांची कामे जास्त होतात.
कामावर पत्ते खेळायचे आणि अब्रु नुकसानीचा दावा करणारे इथे आहेत. पत्ते तुम्ही खेळायचे आणि न्यायालयाच्या चकरा आम्हाला मारायला लावायच्या. तुमच्याच माणसाने तुमचा कार्यक्रम केला असं सांगत सुप्रिया सुळेंनी माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता टोला लगावला.
सुप्रिया सुळे यांच्या मांसाहाराच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी यावर काहीही बाेलणार नाही. यावर वारकरीच उत्तर देतील.
If My Pandurang Accepts Me Eating Mutton, Why Do You Have a Problem? Questions Supriya Sule
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार