Revenue Minister Bawankule : खरेदी रद्द करायची आहे, मग ४२ कोटीची नोटीस का ? कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांचा सवाल

Revenue Minister Bawankule : खरेदी रद्द करायची आहे, मग ४२ कोटीची नोटीस का ? कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांचा सवाल

Revenue Minister Bawankule

विशेष प्रतिनिधी

पुणे : Revenue Minister Bawankule  गैरप्रकाराच्या आरोपांनंतर जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करणाऱ्या अमेडिया कंपनीला बुडवलेले मुद्रांक शुल्क आणि यापोटी ४२ कोटी भरण्याचेआदेश मुद्रांक शुल्क विभागाने नोटिशीद्वारे दिले होते. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मुंढवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे, तर ४२ कोटी रुपयांची नोटीस का दिली,’ असा प्रश्न उपस्थित केला. याबाबत आपण नोंदणी महानिरीक्षकांकडून (आयजीआर) माहिती घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. Revenue Minister Bawankule

भाजपच्या बैठकीसाठी बावनकुळे पुण्यातील पक्ष कार्यालयात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला वादग्रस्त जमिन प्रकरणामध्ये बजावलेल्या ४२ कोटीच्या नोटीसवर भाष्य केले. ते म्हणाले, मुंढवा येथील सरकारी जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये प्रथमदर्शनी जे दोषी दिसतात, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीला एका महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. हा अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. यामध्ये आणखी कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होईल. अहवाल येण्यापूर्वी त्यावर भाष्य करणे म्हणजे तपासाला बाधा पोहचवण्यासारखे आहे. Revenue Minister Bawankule



बोपोडी येथील जमिन खरेदी प्रकरणामध्ये लिहून देणार किंवा लिहून घेणार म्हणून पार्थ पवार यांच्या कुठेही सह्या नाहीत. या प्रकरणाचीही चौकशी महसूल आणि पोलिस विभाग स्वतंत्र करत आहेत. चौकशीमध्ये कसल्याची प्रकारचा पक्षपात होणार नाही, शेवटी कागदपत्रे आहेत.

शीतल तेजवाणी या न्यायालयात गेल्याच्या प्रश्वावर बावनकुळे म्हणाले, सरकारी प्रॉपर्टी खरेदी विक्री आहे, त्यामुळे सरकार न्यायालयात योग्य ती बाजू मांडेल. माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पाटबंधारे विभागातील घोटाळ्याप्रमाणे हाही जमिन घोटाळा दाबला जाईल, असे म्हंटल्या च्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, अंजली दमानिया व त्यांचे शिष्टमंडळ मला भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याकडील पुरावे त्या चौकशी समितीसमोर मांडणार आहेत. महसूल विभागाचे आयुक्त विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य कारवाई होईल, असेही बावनकुळे म्हणाले.

If the purchase is to be cancelled, why issue a notice of 42 crore? asks Revenue Minister Bawankule on Koregaon Park land scam.”

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023