Ravindra Dhangekar :विक्री व्यवहार रद्द झाला तर माेहाेळांना जिलेबी भरवेन अन्यथा पुन्हा मैदानात, रवींद्र धंगेकर यांचा इशारा

Ravindra Dhangekar :विक्री व्यवहार रद्द झाला तर माेहाेळांना जिलेबी भरवेन अन्यथा पुन्हा मैदानात, रवींद्र धंगेकर यांचा इशारा

Ravindra Dhangekar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ravindra Dhangekar पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा विक्री व्यवहार दोन दिवसांत जर पूर्णपणे रद्द झाला, तर मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जिलेबी भरवेन. पण जर हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या रद्द झाला नाही, तर मी पुन्हा मैदानात उतरेन, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.Ravindra Dhangekar

जैन बाेर्डिंगच्या वादग्रस्त व्यवहारात सहभागी असलेल्या बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबतचा निर्णय ई-मेलद्वारे जैन ट्रस्टचे चेअरमन आणि ट्रस्टींना कळवला असून, धर्मदाय आयुक्तालयालाही याबाबत पत्र पाठवले आहे. ई-मेलमधून त्यांनी स्पष्ट केलं आहे की, नैतिकतेच्या आणि धर्मीय भावनांचा आदर राखत ते या व्यवहारातून माघार घेत आहेत. आधी जमा केलेले 230 कोटी रुपये परत देण्याची मागणीही गोखले यांनी केली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या व्यवहारात अप्रत्यक्षरीत्या भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात करत आक्रमक भूमिका घेतली हाेती.Ravindra Dhangekar



रवींद्र धंगेकर यांनी साेमवारी जैन बाेर्डिंगच्या आवारात असलेल्या जैन मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. धंगेकर म्हणाले, की, दोन दिवसांत जर हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जिलेबी भरवेन. मी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला आहे की, दोन दिवस मी गप्प बसेन. ते माझे नेते आहेत आणि त्यांच्या सन्मानासाठी मी काही बोलणार नाही. पण चुकीचं घडत असेल तर मी शांत बसणार नाही. पण जर हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या रद्द झाला नाही, तर मी पुन्हा मैदानात उतरेन.

विशाल गोखले फार मोठा उद्योगपती नाही. तो एकेकाळी लहान बिल्डर होता. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत त्याची प्रचंड प्रगती झाली, आणि ती काही योगायोगाने झाली नाही, असा आराेप करत धंगेकर म्हणाले, विशाल गोखले याने ई-मेल पाठवला असेल तरी मला अजून विश्वास बसत नाही. जोपर्यंत कायदेशीररीत्या हा व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. हा व्यवहार ट्रस्टींनी केला होता आणि आता तेच लोक गायब झाले आहेत. त्यांना पकडून आणणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
मंदिराच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री झाल्याचा आरोप होत असल्याने छत्रपती संभाजीनगरातील जैन समाज आक्रमक झाला आहे. समाजाच्या वतीने राजाबाजार येथून मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने पुरुष, महिला आणि समाजातील वरिष्ठ सदस्य सहभागी झाले होते.

If the sale transaction is canceled, the crowd will be filled with jalebis, otherwise it will be back in the field, warns Ravindra Dhangekar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023