मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

Prakash Ambedkar

विशेष प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सांगितले की, ‘एखाद्या मंत्र्याला अमुकअमुक कारणामुळे काढा’ तर काढता येईल. हे राज्यघटनेतच आहे. असे असताना विद्यमान सरकारला पुन्हा ३० दिवसांच्या मुदतीची घटनादुरूस्ती कशासाठी हवी आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. Prakash Ambedkar

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले, घटनादुरुस्ती करून मंत्र्यांना काढावे लागत आहे.  याचा अर्थ त्यांच्यात एखाद्याला काढण्याची धमक राहिलेली नाही. राजकीय पक्षांचे नेते पक्षातील नेत्यांना सांभाळण्याचे काम करतात, देश, देशाची व्यवस्था, जनहित याच्याशी त्यांचा काही संबध राहिलेला नाही. सर्वच राजकीय पक्षांची थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. पक्षापलिकडे जाऊन देशहित पाहणारे राजकीय नेतृत्वच राहिले नाही. अटलबिहारी वाजपेयी व त्यानंतर डॉ. मनमोहनसिंग या श्रेणीतील अखेरचे नेते होते.

आंबेडकर म्हणाले, देशातील दलित मतदारांची संख्या ९ टक्के आहे. त्यातील ३० टक्के मतदार हा काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. देशाच्या एकूण मतदारांपैकी ३० टक्के मतदार असा आहे की तो दलित उमेदवारांना कधीही मतदान करणार नाही. त्यामुळेच त्या मतांचा प्रभाव राहिलेला नाही, मात्र येत्या २० वर्षांमध्ये या स्थितीमध्ये मोठा फरक पडेल, शिकलेल्या नव्या दलित पिढीचे विचार वेगळे आहेत, ते त्यांचा प्रभाव निश्चितपणे निर्माण करतील.

राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे, मात्र त्याऐवजी त्यांनी सायंकाळी ६ वाजल्यानंतर झालेल्या मतदानाच्या चित्रणाचा मुद्दा लावून धरायला हवा. याचे कारण खुद्द निवडणूक आयोगानेच सायंकाळी ६ नंतरच्या मतदानाचे चित्रिकरण उपलब्ध नाही असे जाहीर केले आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर करून घ्यायच्या मतदानाचे काही नियम आहे. त्याचे पालन केले गेले की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. वाढलेले मतदार किंवा दुबार मतदार हा मुद्दा फार महत्वाचा नाही, मतदार यादी अद्यायावत करण्याचे काम सुरूच असते असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले.

अमेरिकेने आपल्याला जास्त टेरिफ लावल्याने देशात मोठा फरक पडणार नाही. देशाला आपल्या व्यापारासाठी आफ्रिकी देश आहेत. अन्य देश आहेत. देशातील २५ कोटी लोक असे आहेत जे १ कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती निर्माण करतात. ही एक मोठी बाजारपेठ आहे व त्याकडे अमेरिकेला दुर्लक्ष करता येणार नाही. रशिया आपला जुना मित्र आहे, पण आता तो पाकिस्तानचाही मित्र झाला आहे. ऑपरेशन सिंदुर नंतर जगातील अनेक देश आपल्याबरोबर नव्हते याकडे लक्ष द्यावे लागेल, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

If there is a provision in the constitution to remove a minister, then why amend the constitution, asks Prakash Ambedkar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023