विशेष प्रतिनिधी
पिंपरी : Ajit Pawar पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध कामांसाठी कर्जरोखे उभारले आहेत. प्रशासनाने महापालिकेला कर्जबाजारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे याची वस्तुस्थिती तपासण्याची सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.Ajit Pawar
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहाटणीत पवार यांचा बुधवारी ‘जनसंवाद’ झाला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील उपस्थित होते.Ajit Pawar Ajit Pawar
पवार म्हणाले की, आज मिळालेल्या सर्व अर्जांची नोंद करण्यात आली आहे. मी स्वत: विभागीय कार्यालयात जाऊन पुणे विभागीय आयुक्त व महापालिका अधिकाऱ्यांशी संबंधित विषयांवर चर्चा करणार आहे. प्रत्येक विभागाशी संबंधित प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या जातील. काही ठिकाणी पीएमआरडीएकडे असलेल्या भूखंडांची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याचे समोर येत आहे. ते फसवणुकीसमान आहे. अशा जमिनी खरेदी करणे चुकीचे आहे. काही ठिकाणी रस्त्यांसाठी भूसंपादन रखडले आहे. रस्त्याला कामाला नागरिक जमीन देत नाहीत, मग विकास कसा करणार?
पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहरात चांगली कामे झाली. त्यामुळे महापालिकेत पुन्हा संधी द्यावी. महाविकास आघाडीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी असावी, असा प्रयत्न करत होतो. आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असावी, अशी आमची अपेक्षा आहे.
Inspection of debt securities raised by Pimpri-Chinchwad Municipal Corporation, information about Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा