विशेष प्रतिनिधी
बारामती : निधी देण्याच्या स्पर्धेतून निवडणुकीत मतांची मदार बदलत चालली आहे. कामावर मत मागण्याऐवजी आता पैशाचे आश्वासन देण्याची स्पर्धा सुरु आहे. अर्थकारणाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा हा चुकीचा प्रवास आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, राजकारणात मतांसाठी कामे दाखवावी लागतात. पण आता उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. निधी देण्याचे आमिष दाखवून मतं मागितली जात आहेत. हे राजकारण योग्य दिशेत जात नाही. या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये फारसं राजकारण आणू नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, या वेळी ठिकठिकाणी विचित्र राजकीय समीकरणे दिसत आहेत. एक पक्ष दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी करत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे… महायुतीत एकमत नाही. मतभेद आहेत. पण निर्णय आता जनता देणार. त्यामुळे आपण शांतपणे पाहत राहणेच योग्य. महायुतीतील दावे आणि प्रतिदावे राजकीय अस्थिरतेकडे संकेत देत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरही पवार बोलले. 50 टक्के आरक्षण मर्यादेवर सर्वोच्च न्यायालय ठाम दिसत आहे. त्यामुळे निर्णय काय येईल यात अनिश्चितता आहे. पुढील दोन-तीन दिवसांत निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या काहीही भाकित करणे चुकीचे ठरेल, असे त्यांनी मत व्यक्त केले. या विषयावर राज्यभरात असलेल्या चिंतेची दखल त्यांनी घेतली.
अतिवृष्टी, पूर आणि निसर्गाच्या थैमानामुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबाबत पवार म्हणाले, नुकसान दोन प्रकारचे आहे, काही ठिकाणी जमीनच वाहून गेली असून काही ठिकाणी शेतीची साधने नष्ट झाली आहेत. सरकारने केवळ कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती दिली आहे. पण हा फक्त तात्पुरता दिलासा आहे. व्याजमाफी आणि योग्य रक्कम दिली तरच शेतकऱ्यांना खरी मदत होईल, अशी मागणी त्यांनी केली.
Instead of asking for votes on work, now promises of money, Sharad Pawar criticizes Mahayuti
महत्वाच्या बातम्या
- भिकारपणा शब्द वापरल्यावरून अजित पवारांनी मागितली जाहीर माफी
- Dilip Walse Patil : माझं राज्यातल वजन थोडं कमी झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
- ‘दुसऱ्याची पोरं आपली सांगू नका’, नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर जोरदार टीका
- Comedian Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा काढली खोडी, टी-शर्टवर कुत्र्याचा फोटो आणि ‘RSS’ सारखे दिसणारे अक्षर



















