विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. लोक स्वतःहून पक्षात येत आहेत. त्यांच आम्ही स्वागत करत आहे. आम्हाला शिव्या शाप देण्यापेक्षा आपल्याला का सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन करावे, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
शिवसेनेतील कोकणातील नेते राजन साळवी यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे देखील ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, दोन-चार माणसं सोडली तर कोण खुश आहे? म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक जण आमच्या पक्षात पक्ष प्रवेश करत आहेत, हे आज तुम्ही पाहिलं. मात्र ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही.
एकनाथ शिंदे म्हणाले, नुकतीच ठाकरे गटाची डॅमेज कंट्रोलची बैठक पार पडली. मात्र ज्यांनी शिवसेनेला, हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केलं त्यांनी आता बैठक घेऊन काय फायदा? विकास विरोधी जे आहेत त्यांना कार्यकर्ते सोडत आहेत.
विधानसभेत महायुतीला विजय मिळाला तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्ते यांना आपल्याकडे वळविण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केल्याचे म्हटले जात आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट ऑपरेशन टायगरवर म्हणाले, मुंबईत जवळपास 35 नगरसेवक आमच्याकडे आले. संभाजीनगर मध्ये 20 ते 22 नगरसेवक आले. सहा महापौर आले, मला सांगा उबाठा गट राहिला तरी कुठे? मुंबई महापालिकेसहित महाराष्ट्रातल्या महानगरपालिका कशा काबीज करायच्या हा आमचा प्रयत्न राहणार आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोण कुठे जाते हे करण्यापेक्षा आपला पक्ष कुठे चाललाय याकडे लक्ष द्या. पक्षाची तुमची असलेली वाताहात. थांबवण्यासाठी काहीतरी बडबड करून पक्ष वाढत नसतो, हे त्यांना कधी कळेल देव जाणे.
Instead of cursing, do self-reflection, Eknath Shinde’s advice to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाचा राष्ट्रीय सन्मान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार
युवक काँग्रेसचे पुण्यात रास्ता रोको आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
Delhi : दिल्ली रेल्वेस्थानक दुर्घटनेमागे षडयंत्र? ‘विहिंप’ने केली सखोल चौकशीची मागणी!