विशेष प्रतिनिधी
पुणे: Devendra Fadnavis भाजप नेते जगदीश मुळीक यांची नुकतीच अँजिओग्राफी आणि दुसऱ्या दिवशी बायपास सर्जरी करण्यात आली. मुख्यमंत्र्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः डॉक्टरांशी बोलून उपचाराची व्यवस्था केली.Devendra Fadnavis
याबाबतचा अनुभव मुळीक यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, भावाप्रमाणे प्रेम करणारे देवाभाऊ! कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे विसरता येत नाहीत. अलीकडे मी माझी सीटी अँजिओग्राफी करून घेतली होती. त्याचा रिपोर्ट चुकीचा आल्याने पुण्यातील डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत मी तात्काळ आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) यांना फोन केला.Devendra Fadnavis
फक्त तीन मिनिटांतच देवाभाऊंनी स्वतः डॉक्टरांशी संपर्क साधून मला परत फोन केला आणि शांतपणे सांगितले, “जगदीश, उद्या दुपारी चार वाजता डॉ. रमाकांत पांडा यांना भेट, मग पुढचं आपण ठरवू.” दुसऱ्या दिवशी मी डॉ. पांडा यांना भेटलो. त्यांनी तपासणी करून तात्काळ अँजिओग्राफी केली आणि परिस्थिती लक्षात घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. पुढच्या दिवशीच माझी बायपास सर्जरी करण्यात आली. हे सर्व इतकं अचानक आणि तातडीचं झालं की कोणाशी काही बोलण्यासही वेळ मिळाला नाही. त्या संपूर्ण काळात माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी माझ्यासोबत ठाम उभे राहिले.Devendra Fadnavis
या सर्व प्रसंगात देवाभाऊंनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली, ती खरंच लहान भावासारखी होती. मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता, आत्मीयता आणि जिव्हाळा मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी डॉक्टरांशी स्वतः संवाद साधला, उपचाराची तातडीने व्यवस्था केली आणि आज, ऑपरेशननंतर काही दिवसांनी, स्वतः भेट द्यायलाही आले. त्यांच्या या भेटीतून मिळालं ते फक्त आशीर्वाद नव्हे, तर मानसिक बळ आणि आत्मविश्वासाचा अनमोल आधार.
देवेंद्रजी फडणवीस हे फक्त नेता नाहीत, तर कार्यकर्त्यांना भावासारखे समजणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला अशाच नेतृत्वाची गरज होती आणि ते नेतृत्व आपल्याला देवभाऊंच्या रूपाने लाभले आहे.
या काळात माझ्या उपचारासाठी तत्परतेने मदत केलेल्या डॉ. रमाकांत पांडा तसेच त्यांची संपूर्ण टीम, डॉ. ज्ञानेश गवारे आणि डॉ. अभिजित लोढा यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या कौशल्यपूर्ण सेवेमुळे आणि देवभाऊंच्या संवेदनशील तत्परतेमुळे आज मी पुन्हा एकदा बळकट उभा आहे.
माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे, कार्यकर्त्यांचे आणि सर्व जनतेचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद याबद्दल मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे.सध्या माझी तब्येत सुधारते आहे आणि काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मी लवकरच पुणेकरांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे.
Jagdish Mulik Undergoes Bypass Surgery, CM Devendra Fadnavis Shows Remarkable Sensitivity
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















