विशेष प्रतिनिधी
पुणे : Lawyers वकिलांवरील होणारे हल्ले रोखण्यासाठी तसेच वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून सोमवारी (दि. ३) कामकाजापासून अलिप्त राहणार असल्याचा ठराव झाला आहे.Lawyers
त्यामध्ये शिवाजीनगर न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील वकील सहभागी होणार आहेत. त्यामुळे, सोमवारी न्यायालयाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.Lawyers
‘गेल्या काही वर्षांपासून वकिलांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे वकिलांवरील होणारे हल्ले, तसेच मारहाणीच्या घटना विचाराचा घेऊन वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्याची गरज बार कौन्सिलने व्यक्त केली आहे. याबाबत बार कौन्सिलने केलेल्या आवहानानंतर सोमवारी पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व वकील एक दिवस कामकाजापासून अलिप्त राहतील.
याबाबत सर्व वकिलांना आवाहनही करण्यात आल्याची माहिती पुणे बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड यांनी दिली. या ठरावाला कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे.
कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी एक दिवस कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आवाहन ‘द फॅमिली कोर्ट लाॅयर्स’ असोसिएशनच्या अध्यक्ष ॲड. कल्पना निकम यांनी त्यांच्या संघटनेला केले आहे.
Lawyers across the state on strike from November 3rd!
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
 
				 
													



















