विशेष प्रतिनिधी
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने संरक्षण सज्जतेसाठी व्यापक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, देशभरातील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा उत्पादन करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या (OFB) अखत्यारीतील सर्व ४१ कारखाने आणि ७ प्रमुख दारूगोळा डेपो येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुट्ट्यांचे आदेश तत्काळ रद्द करण्यात आले आहेत.
शुक्रवारी (२ मे) दुपारी उशिरा संरक्षण मंत्रालयाकडून थेट दिल्ली येथून हे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार, पुणे येथील देहूरोड आणि खडकी दारूगोळा कारखाना व डेपो या दोन्ही ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनाही तात्काळ कामावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे सध्या सुट्टीवर असलेले अधिकारी आणि कर्मचारी देखील कामावर परत येण्याच्या तयारीत आहेत.
सध्या देशातील विविध दारूगोळा डेपोमध्ये पुढील काही महिन्यांपुरता मुबलक साठा उपलब्ध असून, सीमाभागांवरही आवश्यक ती सामग्री आधीच पोहोचवण्यात आलेली आहे. मात्र, वाढत्या सुरक्षा स्थितीचा विचार करता अतिरिक्त उत्पादनाची तयारी ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
यासोबतच, भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल यांच्याकडून विशेष मागण्या प्राप्त होण्याची शक्यता लक्षात घेता कारखान्यांना २४x७ कार्यरत ठेवण्याचा विचार संरक्षण खात्याने सुरु केला आहे. या हालचालींमुळे देशात संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आणीबाणीजन्य परिस्थितीप्रमाणे कार्यवाही सुरु झाली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA), संरक्षण सचिव आणि लष्कर प्रमुख यांच्यात तातडीची बैठक घेऊन देशाच्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेण्यात आला असून, या निर्णयास गती देण्यात आली आहे.
Leave of all ammunition factory employees cancelled immediately
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती