विशेष प्रतिनिधी
नागपूर : कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माधुरी मिसाळ यांना विधिमंडळातच अश्रू अनावर झाले. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये माधुरी मिसाळ ढसाढसा रडल्या. Madhuri Misal expressed her displeasure
माधुरी मिसाळ यांनी आपल्या मनातील सल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे आणि गिरीश महाजन यांच्यासमोर बोलून दाखविली.
माधुरी मिसाळ भाजपच्या वरिष्ठ आमदारांपैकी एक आहेत. मात्र आपल्यापेक्षा ज्युनिअर आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र आपल्याला राज्यमंत्रिपद देण्यात आलं ही मिसाळ यांची खंत आहे. मागील अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ असून देखील कॅबिनेट मंत्रिपदासाठी डावललं गेलं. तर इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर संधी देण्यात आल्याचं देखील माधुरी मिसाळ यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ 2009 ते 2024 अशा सलग चौथ्यांदा आमदार झाल्या आहेत. विजयाचा चौकार लगावल्यानंतर भाजपने त्यांना राज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. पुणे महापालिकेच्या नगरसेविका ते आमदार आणि आता राज्यमंत्री असा माधुरी मिसाळ यांचा प्रवास राहिला आहे.