अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे, माधुरी मिसाळ यांच्या सूचना

अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे, माधुरी मिसाळ यांच्या सूचना

विशेष प्रतिनिधी

पुणे : कसबा मतदारसंघात स्वच्छतेच्या बाबतीत सुरू असलेले काम कौतुकास्पद असून फ्लेक्समुक्त कसबा तसेच शहर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. यासोबतच अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पालिका तसेच पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले आहे.

“आज कसबा मतदारसंघातील संपूर्ण कचऱ्याची ठिकाणे साफ करून त्यांचे सुशोभीकरण करण्याचा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आमदार हेमंत रासने यांनी हाती घेतला आहे. पुणे शहराला लाभलेल्या कला, संस्कृती आणि इतिहासाचं वैभव परत आणण्यासाठी त्यांनी पहिले ठोस पाऊल उचललं आहे. त्यांच्या या ड्राईव्हला माझ्या खूप खूप शुभेच्छा असून, नगरविकास मंत्री म्हणून त्यांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन’’, असे मिसाळ यांनी म्हटले आहे.

आज नागनाथ पार येथे छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्याच्या राजमुद्रांचे भव्य शिल्प अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, प्रदेश सरचिटणीस श्री राजेश पांडे, घनकचरा उपायुक्त श्री. संदीप कदम, झोन १ चे पोलीस उपायुक्त श्री. कृषीकेश रावले, विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे श्री. वालगुडे व श्री. बल्लाळ, मंडल अध्यक्ष श्री. अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे तसेच मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती


मंत्री मिसाळ यांच्या हस्ते आज “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” मिशन अंतर्गत नागनाथ पार चौक, सदाशिव पेठ येथे उभारण्यात आलेल्या ३डी शिल्पकृतीचे उद्घाटन करण्यात आले. एकूण २२ ठिकाणी अशी शिल्पे साकारली असून कसबा उभारण्यात आली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्वी कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणांचा पूर्णतः कायापालट करून त्या जागा आकर्षक, शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध करण्यात येत आहेत.

यावेळी मिसाळ म्हणाल्या, इंदौर ला जाऊन सर्व भाजप पदाधिकाऱ्यांसह अभ्यास करण्याचा माझा प्रयत्न होता मात्र काही अडचणींमुळे शक्य झाले नाही. आमदार रासने यांनी मात्र इंदौरचा दौरा करून कसबा मतदारसंघ स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात कसबा हा रोल मॉडेल म्हणून ओळखला जाईल याबद्दल मला विश्वास आहे. आमदार रासने यांच्या फ्लेक्स मुक्त कसबा अभियानाबाबत बोलताना त्यांनी कसबा नव्हे संपूर्ण शहरातील फ्लेक्स अगदी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स देखील प्रशासनाने हटवावेत असे आवाहन केले.

या वेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघ हा ऐतिहासिक वारसा असलेला भाग आहे. इथे फक्त स्वच्छता नव्हे, तर सौंदर्यीकरण, संस्कृती आणि सामाजिक जाणीव या सगळ्यांचा समन्वय साधणं गरजेचं आहे. या २२ ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या शिल्पांमधून आपण फक्त कचऱ्याच्या जागा बदलत नाही, तर मानसिकताही बदलतो आहोत. हा उपक्रम नागरिकांच्या सहभागातून यशस्वी करणार असून, पुढील काळात कसबा हे स्वच्छतेचं आणि सौंदर्यीकरणाचं मॉडेल म्हणून ओळखलं जाईल, हा माझा विश्वास आहे.”

आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “शहराच्या सौंदर्यीकरणासाठी अशा कल्पक उपक्रमांची गरज आहे आणि आमदार रासने यांची ही संकल्पना निश्चितच अनुकरणीय आहे. महानगर पालिका या कामात जे जे सहकार्य लागेल ते सर्व करेल. केवळ कसबा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण पुणे शहर स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा उपक्रम असून, नागरी भागातील शिस्त आणि स्वच्छतेला चालना मिळेल. आगामी काळात या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. येणारा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या काळात गणेश मंडळे,नागरिक यांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपले शहर स्वच्छ आहे, महिलांसाठी सुरक्षित आहे हे आपण गणेशोत्सवाच्या निमित्ताने दाखवून दिले जाईल. यावेळी आयुक्तांनी वाहतुक विभागाला रस्त्यावर अनेक दिवसांपासून पडून असणारी वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले. पालिकेच्या अतिक्रमण विभागाला देखील सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Madhuri Misal suggests that the administration should work together to remove encroachments and smoothen traffic.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023